मुंबई,
Alia Bhatt बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या 77 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मोठा खुलासा झाला असून तिची माजी वैयक्तिक सहाय्यक (पर्सनल असिस्टंट) वेदिका प्रकाश शेट्टी (वय 32) हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. जवळपास पाच महिन्यांच्या शोधानंतर वेदिकाला बेंगळुरूमधून अटक करण्यात आली असून, ही घटना सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
बनावट बिले आणि वैयक्तिक खात्यांमधून पैसे लंपास
वेदिका शेट्टी Alia Bhatt ही 2021 मध्ये आलिया भट्टची पर्सनल सेक्रेटरी म्हणून कार्यरत होती. या काळात तिला अभिनेत्रीच्या वैयक्तिक व्यवहारांपासून ते प्रॉडक्शन हाऊसच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, विश्वासघात करत तिने बनावट बिले तयार करून आलिया भट्टच्या प्रॉडक्शन कंपनी ‘एटरनल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ आणि तिच्या वैयक्तिक बँक खात्यांमधून तब्बल ₹76,90,892 रुपयांची रक्कम हडप केल्याचे उघड झाले आहे.
जुहू पोलिसांकडून पाच महिन्यांची तपासमोहीम
या प्रकरणात Alia Bhatt अभिनेत्रीच्या आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सोनी भट्ट यांनी मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वेदिका शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल पाच महिन्यांच्या तपासानंतर अखेर वेदिकाचा ठावठिकाणा लागला आणि पोलिसांनी बेंगळुरूमधून तिला अटक केली. सध्या वेदिकाला पाच दिवसांच्या ट्रांझिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आलं असून, तिला मंगळवारी (८ जुलै) न्यायालयात हजर करण्यात आलं.तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की, हा आर्थिक घोटाळा मे 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत म्हणजे तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक काळ सुरु होता. या काळात वेदिकाने पदाचा गैरवापर करत आर्थिक व्यवहारांमध्ये धांदल माजवत फसवणूक केली.
अभिनेत्रीची प्रतिक्रिया अद्याप नाही
सध्या या संपूर्ण प्रकरणावर ना आलिया भट्टने, ना तिच्या प्रॉडक्शन हाऊसनं कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं आहे. पोलिसांकडून तपास सुरु असून वेदिका शेट्टीकडून अधिक माहिती घेतली जात आहे. तिच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे पुरावे गोळा करण्यात आले असून तिच्या अटकेने बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.