मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर भगदाड

09 Jul 2025 11:36:50
गोंदिया, 
Mumbai-Kolkata National Highway जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील मासुलकसा घाट परिसरात काल दरड कोसळल्यानंतर याच परिसरात सहा महिन्यांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या उड्डाण पुलावर भेगा पडल्याची घटना घडली होती, दरम्यान, त्याची डागडूजी केल्यानंतर आज,९ जुलै रोजी पुन्हा या पुलावर एक भलामोठा भगदाड पडला आहे. त्यामुळे या पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

Mumbai-Kolkata National Highway 
मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील मासूलकसा घाट परिसरात गेल्या सहा महिन्यांपूर्वी उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्यात आले होते. या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट अग्रवाल ग्लोबल कंपनीला देण्यात आले होते. विशेष म्हणजे, काल ८ जुलै रोजी पुलावर भेगा पडल्याची घटना उघडकीस आली होती. Mumbai-Kolkata National Highway यानंतर या पुलाची डागडूजी करण्यात आली होती. मात्र, या पुलाच्या निकृष्ट कामाची आज सकाळी चांगलीच पोलखोल झाली असून पुन्हा त्याच ठिकाणी मोठा भगदाड पडलेला आहे. पहिल्याच पावसात या बांधकाम करणाऱ्या कंपनीचे पितळ उघडे पडले असतानाच पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. तेव्हा या पूल बांधकामाची चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0