धक्कादायक! पाकिस्तानी अभिनेत्रीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला

09 Jul 2025 12:06:18
इस्लामाबाद,
Humaira Asghar passed away पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल हुमैरा असगर यांचे निधन झाले आहे. कराचीतील एका अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह आढळला. अधिकाऱ्यांनी ८ जुलै रोजी तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. हुमैरा यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने तिच्या मृत्यूच्या कारणाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
 
 

Pakistani actress and model Humaira Asghar passed away 
डीआयजी सय्यद असद रझा यांनी स्थानिक माध्यमांना माहिती दिली की अधिकारी दुपारी ३ वाजता तिच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले. पोलिसांनी प्रथम वारंवार दरवाजा ठोठावला, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते दरवाजा तोडून आत गेले. त्यांना अपार्टमेंटमध्ये हुमैराचा मृतदेह आढळला. असा अंदाज लावला जात आहे की हुमैराचा मृत्यू काही आठवड्यांपूर्वी झाला होता.
 
 

हुमैरा कधी मरण पावली?
 
 
डीआयजी रझा म्हणाले, 'हा मृतदेह काही दिवस जुना असल्याचे दिसून येते. हुमैराचे वय ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. गेल्या सात वर्षांपासून ती या अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती. घरात कोणतीही हालचाल जाणवत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम तात्काळ पाठवण्यात आली.' हुमैराचा मृत्यू कसा झाला याबद्दल अद्याप काहीही उघड झालेले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.पुढील तपासणीसाठी मृतदेह जिन्ना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आला. डॉ. सुम्मैया सय्यद म्हणाल्या की, मृतदेह कुजला आहे आणि सध्या मृत्यूचे नेमके कारण सांगणे कठीण आहे. पुढील तपास आवश्यक आहे.
 
हुमैरा कोण आहे?
हुमैरा ही Humaira Asghar passed away पाकिस्तानी इंडस्ट्रीतील एक उदयोन्मुख स्टार होती. ती स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम करत होती. तिचे इंस्टाग्रामवर ७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय होती. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत राहते.
Powered By Sangraha 9.0