रवीना टंडन यांच्या हस्ते ‘द ब्रेवहार्ट्स’ पुस्तकाचे प्रकाशन

भारतीय लष्कराच्या प्रेरणादायी सुधार योजनेचा पर्दाफाश

    दिनांक :09-Jul-2025
Total Views |
मुंबई
Raveena Tandon प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन यांच्या हस्ते वरिष्ठ पत्रकार व चित्रपट निर्माते रामचंद्रन श्रीनिवासन लिखित ‘द ब्रेवहार्ट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक भारतीय लष्कराच्या आतंकवादविरोधी लढ्यातील एक अत्यंत प्रेरणादायी आणि आजवर फारसे न उघड झालेलं, पण महत्त्वपूर्ण अशा सुधारात्मक मिशनवर प्रकाश टाकते. या योजनेच्या माध्यमातून ३,००० पेक्षा अधिक माजी दहशतवाद्यांचे पुनर्वसन करून त्यांना भारतीय लष्करात समाविष्ट करण्यात आले होते. तब्बल २३ वर्षे गुप्तपणे राबवले गेलेल्या या मोहिमेचे आता प्रथमच दस्तऐवजीकरण झाले आहे.
 

Raveena Tandon releases the book The Bravehearts 
या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना रवीना टंडन म्हणाल्या, “ही केवळ एक पुस्तक नाही, तर आपल्या डोळ्यांपुढे एक नवीन वास्तव उभं करते. ही आपल्याला शिकवते की खरी ताकद केवळ शत्रूला हरवण्यात नाही, तर त्याला आपल्या राष्ट्राचा रक्षक बनवण्यात आहे. ‘द ब्रेवहार्ट्स’ ही अशी कथा आहे, जी प्रत्येक भारतीयाच्या हृदयापर्यंत पोहोचली पाहिजे.”या पुस्तकाचे लेखक आणि या मोहिमेचे दस्तऐवजीकरण करणारे रामचंद्रन श्रीनिवासन यांनी सांगितले, “या कथा कधीच गुप्त ठेवायला नको होत्या. राष्ट्राने हे जाणले पाहिजे की शांततेची सेवा कशी असते. या मोहिमेत केवळ लोकांचे जीवनच वाचवले गेले नाही, तर विश्वास आणि देशभक्तीचे नव्याने पुनर्निर्माण करण्यात आले.”
 
 
या सुधारणात्मक Raveena Tandon मोहिमेच्या प्रमुख रणनीतीकारांपैकी एक आणि संघर्ष निवारण तज्ज्ञ संजय कुमार यांनी म्हटलं, “ही फक्त मानसिकता बदलण्याची गोष्ट नव्हती – ही त्यांचा सन्मान परत मिळवून देण्याची प्रक्रिया होती. आम्हाला त्यांच्या क्षमतेवर विश्वास होता आणि त्यांनीही आपली सेवा इमानदारीने बजावून तो विश्वास सार्थ ठरवला.”या योजनेचा प्रत्यक्ष अनुभव सांगताना माजी दहशतवादी आणि आता भारतीय जवान बनलेले मुश्ताक अहमद भट म्हणाले, “कधी काळी लोक यांच्यापासून घाबरायचे – पण आज हेच लोक अभिमानाने लष्करी गणवेश परिधान करतात. मी स्वतः हा बदल अनुभवला आहे. हे पुस्तक केवळ आमच्याबद्दल नाही, तर भारताने द्वेषाऐवजी मानवतेची निवड केली, तेव्हा आपण काय साध्य करू शकतो, याबद्दल आहे.”या कार्यक्रमात उपस्थितांनी या संपूर्ण मोहिमेमागील भावनिक, सामाजिक आणि राष्ट्रहिताची बाजू ऐकून भारावून गेले. या योजनेने केवळ खंडित भागांमध्ये शांततेचा संदेश दिला नाही, तर अनेक तरुणांना कट्टरतेच्या मार्गावरून वळवून सन्मानाच्या आणि समावेशक राष्ट्रवादाच्या दिशेने चालवले.