Walnuts सुका मेवा खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करतात.
अक्रोड- शरीरासाठी सुपरफूड !
विशेषतः अक्रोड हे मेंदू आणि हृदयासाठी सर्वोत्तम मानले जातात. त्यामध्ये असणारे ओमेगा-३ फॅटी ॲसिड हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्यातील फायबर पचनासाठी फायदेशीर असून, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात. अक्रोडमुळे शरीरातील सूज कमी होते.
कोणती पोषकतत्त्वे असतात अक्रोडमध्ये ?
अक्रोड हे व्हिटॅमिन ई, ए, सी, आणि के यांचे चांगले स्रोत आहेत. त्यामध्ये फोलेट, झिंक, कॉपर, सेलेनियम, फॉस्फरस आणि कोलीन आढळतात. याशिवाय त्यात प्रथिने, फायबर, सॅच्युरेटेड आणि असंतृप्त फॅट्स देखील भरपूर प्रमाणात असतात.
अक्रोड खाण्याची योग्य पद्धत कोणती ?
रोज सकाळी रिकाम्या पोटी २-३ अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून खाणे हे सर्वाधिक फायदेशीर मानले जाते. कोरडे अक्रोड देखील खाता येतात, परंतु भिजवलेले अक्रोड अधिक पोषणदायक असतात.
अस्वीकरणः ही माहिती फक्त शैक्षणिक आणि सामान्य माहितीसाठी दिली आहे. आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.