नवी दिल्ली,
71st National Film Awards : राजधानी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विन वैष्णव यांनी ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी ज्युरीने २२ भाषांतील ११५ हून अधिक चित्रपट पाहून नामांकनांची निवड केली होती.

हिंदी भाषेतील ‘द फर्स्ट फिल्म’ या चित्रपटाला पियूष ठाकूर यांच्या दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. तसेच मनीष सैनी दिग्दर्शित ‘गिद्ध – द स्कॅव्हेंजर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्मचा पुरस्कार ‘द सायलेंट एपिडेमिक’ या अक्षत गुप्ता दिग्दर्शित चित्रपटाला मिळाला, जो रस्ता अपघात व नागरी जनजागृतीवर आधारित आहे. ‘गॉड वल्चर अँड ह्यूमन’ या ऋषिराज अग्रवाल दिग्दर्शित चित्रपटाला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार मिळाला. ‘टाइमलेस तमिळनाडू’ या इंग्रजी भाषेतील कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कला व संस्कृती फिल्मचा पुरस्कार मिळाला. तर उडिया भाषेतील ‘मा बोउ मो गाान’ (माझी आई माझं गाव) या संजीव प्रसार दिग्दर्शित चित्रपटाला सर्वोत्कृष्ट जीवनपट फिल्मचा पुरस्कार मिळाला.
सिनेमा विषयक लेखनात आसामीय भाषेतील समीक्षक उत्पल दत्ता यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक म्हणून गौरविण्यात आले. त्याचबरोबर गैर-फीचर फिल्म श्रेणीत ‘द फ्लॉवरिंग मॅन’ (हिंदी) ला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म घोषित करण्यात आली. विशेष उल्लेखामध्ये मलयाळममधील ‘नेकल – पड्ड्यनचा इतिहास’, ओडिया भाषेतील ‘ऋतु आणि सात गाव’, तसेच फीचर फिल्म श्रेणीत ‘ऍनिमल’चा समावेश होता.
सर्वोत्कृष्ट पटकथा (गैर-फीचर फिल्म) हा पुरस्कार कन्नड भाषेतील ‘सनफ्लॉवर’ला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट निवेदन/व्हॉईस ओव्हर या श्रेणीत ‘द स्केयर्ड जॅक – एक्सप्लोरिंग द ट्री ऑफ विशेस’ (इंग्रजी) या चित्रपटाला गौरवण्यात आले.
प्रादेशिक भाषांतील उत्तम चित्रपटांमध्ये गारो भाषेतील ‘रिमडोगिटांगा’ (रॅप्चर) ला सर्वोत्कृष्ट गारो फिल्म, तर तेलुगु भाषेत रामकुमार बालकृष्णन दिग्दर्शित ‘पार्किंग’ ला सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म घोषित करण्यात आले. पंजाबी भाषेतील विजयकुमार अरोरा दिग्दर्शित ‘गॉडडे गॉडडे चा’ ला सर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म, तर ओडिया भाषेतील शुभ्रांशु दास दिग्दर्शित ‘पुष्करा’ ला सर्वोत्कृष्ट उडिया फिल्म म्हणून निवडण्यात आले. कन्नड भाषेतील ‘कोंडेलू’, मलयाळममधील ‘उलोझुक्कु’ (क्रिस्टो टॉमी दिग्दर्शित), आसामी भाषेतील ‘रोंगटापु’, बंगाली भाषेतील ‘डीप फ्रिज’, गुजराती भाषेतील ‘वश’ या चित्रपटांना त्यांच्या भाषेतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार जाहीर झाले.
लोकप्रिय श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका हा पुरस्कार ‘जवान’ चित्रपटातील छलिया या गाण्यासाठी शिल्पा राव यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील ढिंढोरा बाजे रे या गाण्याला पुरस्कार मिळाला. या गाण्याची नृत्यरचना वैभवी मर्चंट यांनी केली होती.
तांत्रिक श्रेणींमध्ये, मलयाळम चित्रपट ‘पुक्कलम’ला सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार देण्यात आला. ‘२०१८’ (मलयाळम) ला सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन, तर हिंदी चित्रपट ‘ऍनिमल’ ला सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाईनचा सन्मान मिळाला. ‘ऍनिमल’ चित्रपटासाठी हर्षवर्धन यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार, तसेच सचिन सुधाकरन आणि हरिहरन मुरलीधरन यांना ध्वनी डिझाईनसाठी गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट स्टंट/ऍक्शन कोरिओग्राफीचा पुरस्कार तेलुगु चित्रपट ‘हनु-मान’ला मिळाला. दिग्दर्शन श्रेणीत ‘द केरळ स्टोरी’ ला सन्मानित करण्यात आले. तसेच AVGC (Animation, VFX, Gaming, Comics) श्रेणीत विशेष कामगिरी करणाऱ्या चित्रपटालाही गौरवण्यात आले.
या सर्व पुरस्कार घोषणेमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण पसरले असून, विविध भाषांतील दर्जेदार चित्रपट व निर्मात्यांना मिळालेला हा मान, भारतीय सिनेमा विविधतेसह जागतिक पातळीवर अधिक सक्षमपणे मांडतो आहे.