चमत्कारिक फायदे देणारे दूध आणि खजूर

    दिनांक :01-Aug-2025
Total Views |
नवी दिल्ली,
milk-and-dates आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पोषणाची कमतरता जाणवते. विशेषतः रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होणे म्हणजेच ॲनिमिया. परंतु काही घरगुती उपाय हे महागड्या औषधा शिवाय मोठा बदल घडवतात. त्यातलाच एक साधा, सहज उपाय म्हणजे दूधात खजूर टाकून त्याचे सेवन करणे.
 

दूध खजूर  
 
 
 
झोपण्या पूर्वी दूध खजूर यांचे सेवन
रात्री झोपण्याच्या सुमारास, एक ग्लास कोमट दूध घ्या आणि त्यात २-३ खजूर टाका. ते १०-१५ मिनिटं भिजू द्या. नंतर ते दूध प्यावे आणि त्यानंतर तेच भिजवलेले खजूर खावे. हाच तो सोपा नि प्रभावी उपाय आहे.
 
कसा होतो फायदा?
खजूरात लोह, फॉलिक अ‍ॅसिड, मॅग्नेशियम, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. दूध हे कॅल्शियम आणि प्रथिनांचा समृध्द स्रोत आहे. हे दोघे मिळून शरीरातील रक्त निर्मिती वाढवतात, थकवा कमी करतात आणि इम्युनिटी वाढवतात.
 
होणारे फायदे
>> हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
>> चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
>> पचन सुधारते.
>> झोप चांगली लागते.
>> मासिक पाळीतील त्रासही कमी होतो.
 
टीप : हा उपाय किमान २१ दिवस नियमित केल्यास परिणाम दिसून येतो. डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
निष्कर्ष : औषधं नव्हे, तर आहारातल्या छोट्या सोप्या सवयीच आरोग्य सुदृढ करतात.milk-and-dates मग आज पासूनच आपल्या दिनक्रमात 'खजूर + दूध' ही सवय जोडा आणि अनुभव घ्या नैसर्गिक आरोग्याचा.