देवरी,
Truck crushed by chassis भरधाव व अनियंत्रीत ट्रक चेसीस वाहन रस्त्याशेजारील पार्कींगमधील वाहनांना धडकत थेट एका दुकानात शिरले. यात एक जण जागीच ठार झाला. तर चौधे गंभीर जखमी झाले. ही घटना आज, १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शहरातील नगर पंचायत कार्यालयाजवळ घडली. सुखदास गावडकर (६०, रा. जरताळटोला) असे मृताचे तरटीकेश राऊत (३८ रा. पिंडकेपार), निलेश वघारे (३७), सुभाष बिंजलेकर (४५) दोन्ही रा.देवरी व सुरेंद्र बनसोड (५२, रा.धोबीसराड) अशी जखमींची नावे आहेत.

शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रं.५३ वर भरधाव वाहनांमुळे अपघाताची शक्यता नेहमीच बळावलेली राहते. भरधाव वाहनांमुळे अनेक आजवर अनेक अपघात घडले असून वाहनांच्या धडकेत काहींचा मृत्यू तर काहींना अपंगत्व आहे आहे. त्यामुळे शहरातून जाणारा महामार्ग नागरिकांना जीवमुठीत घेऊन ओलांडावा लागतो. त्यातच आज श्ाुक्रवारी नागपूरकडून रायपूरकडे भरधाव जाणारा ट्रक चेसीस वाहन रस्त्याशेजारील पार्कींग तुडवित थेट एका दुकानात शिरला. यात एकाचा चिरडून मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले. Truck crushed by chassis तसेच पार्कींगमधील दोन दुचाकी व एक चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे परिसरात काही वेळासाठी प्रचंड गोंधळ उडाला आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली. दरम्यान जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तर यातील नीलेश वघारे हे गंभीर जख्मी असल्याने त्यांना नागपुरला हलविन्यात आले. देवरी पोलिसांनी ट्रक चेचीस वाहनाच्या चालकाला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
उड्डाणपुलाची मागणी
राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर स्थित असलेल्या तालुक्याचे ठिकाण देवरी हा शहरातून जाणारा हा मार्ग अत्यंत गजबजलेला आणि गर्दीचा परिसर आहे. Truck crushed by chassis या मार्गाने सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ राहत असून वाहतुकीची कोंडी नेहमीच हात असून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याचा सर्वाधिक त्रास स्थानिक नागरिकांना होत असून देवरी येथे उड्डाण पूल तयार करण्याची मागणी होत आहे.