बॉलिवूडमध्ये बहिणींच्या नात्याचं सुंदर से᠎̮लिब्रेश्‌न्‌

    दिनांक :10-Aug-2025
Total Views |
मुंबई
Raksha Bandhan रक्षाबंधन हा परंपरेने भाऊ-बहिणींच्या प्रेमाचा सण मानला जातो, मात्र बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांचा भाऊ नाही. त्यामुळे त्या दरवर्षी आपल्या बहिणींशी हा सण साजरा करतात आणि एकमेकींच्या संरक्षणाचे वचन देतात.
 

Bhumi Pednekar Raksha Bandhan 
अभिनेत्री भूमि पेडणेकरने इन्स्टाग्रामवर रक्षाबंधनाच्या सेलिब्रेशनच्या काही खास छायाचित्रांचा संग्रह शेअर केला. कुटुंबासोबत हा सण साजरा करताना भूमीने आपल्या बहिणी समीक्षा हिच्याकडून राखी बांधून घेतली. बहिणींसोबतची तिची गोड नाळ या छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसून येते.शिल्पा शेट्टीनेही रक्षाबंधनानिमित्त बहिण शमिता शेट्टीसोबतच्या ग्लॅमरस फोटोंचा खास अल्बम चाहत्यांसोबत शेअर केला. दरवर्षी शिल्पा आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेते आणि या वेळेसही तिने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.कृति सेनन आणि तिची बहिण नुपूर सेनन यावर्षी रक्षाबंधनाला एकमेकींपासून दूर होत्या. तरीही त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे हा सण साजरा केला. नुपूरने सोशल मीडियावर वेकेशनदरम्यानच्या आठवणी शेअर करत बहिणीला शुभेच्छा दिल्या. कृतिनेही इन्स्टाग्राम स्टोरीवर दोघींनी हातावर बांधलेली राखी दाखवणारा फोटो पोस्ट केला.