पालकमंत्र्यांच्या हस्ते समुद्रपूर येथील तालुकास्तरीय शिबिराचे उद्घाटन
वर्धा,
Dr. Pankaj Bhoyar गेल्या काही काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्य गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहे. आता राज्यातील रुग्णांना शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात देखील विनामूल्य उपचार, शस्त्रक्रिया केल्या जात आहे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
मोतिबिंदू विरहीत अभियानांतर्गत विद्याविकास महाविद्यालय, समुद्रपूर येथे आयोजित तालुकास्तरीय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. Dr. Pankaj Bhoyar यावेळी आमदार समिर कुणावार, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, नगर पंचायतच्या नगराध्यक्षा योगिता तुळणकर, उपाध्यक्ष बाबाराव थुटे, संजय गाते, निलेश पोहेकर, प्रेमबाबु वसंतानी, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, तहसीलदार कपील हाटकर आदी उपस्थित होते.
आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्त्यांनी गावोगावी अभियान पोहोचविले. अभियानाची माहिती दिली. रुग्णांना शिबिरापर्यंत आणले, त्यामुळे या सर्वांचे योगदान कौतुकास्पद आहे. सिंचनाच्या सोयीसाठी धाम व बोर प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी ४२१ कोटी रुपये मंजूर केले आहे. Dr. Pankaj Bhoyar यामुळे वर्धा, समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. प्रकल्पाचे कॅनल व इतर कामे होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणार आहे. पांदण रस्त्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस शुल्क माफ करण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
शिबिरातून लोकांच्या जीवनात आंनद निर्माण करण्याचे काम - आ.समीर कुणावार
दैनंदिन कामामुळे शरीराकडे दुर्लक्ष होते. डोळा शरीराचा महत्वाचा अंग आहे. डोळ्यामध्ये मोतिबिंदू झाल्यावर सहज लक्षात येत नाही. उघड्या डोळ्याने जग पाहणाऱ्याला मोतिबिंदूमुळे अंधत्व येत संपूर्ण अंधार दिसतो. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून मोतिबिंदू तपासणी शिबिरे पुर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. Dr. Pankaj Bhoyar या शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम होते आहे. हिंगणघाट व समुद्रपूर येथील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. आता शिबिर संपल्यानंतर शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचे आमदार समीर कुणावार म्हणाले.
ट्रायसिकल, व्हीलचेअर, किसान विकास पत्र वाटप
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या दिव्यांग निधीतून दिव्यांग विद्यार्थीनींना २५ हजाराचे किसान विकास पत्र, शिबिरात तपासणी झालेल्या काही रुग्णांना ट्रायसिकल, व्हीलचेअर Dr. Pankaj Bhoyar तसेच सिंचन विहीर मंजूर प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच अवयवदानाचा संकल्प केल्याबाबत जयकिशारे हरिचंद्र मोरे व मनेश रामचंद्र गोटे यांचा सत्कार करण्यात आला.
रुग्ण तपासणीसाठी तज्ञांची 39 पथके
सुरुवातीला पालकमंत्र्यांनी फीत कापून शिबिराचे उद्घाटन केले. शिबिर स्थळी रुग्ण तपासणीसाठी पुरुषांसाठी 19 व महिलांसाठी स्वतंत्रपणे 20 असे एकून तज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वात 39 पथके नेमण्यात आली होती. त्याठिकाणी तपासणी, चष्मे वाटप, नोंदणी, औषध वितरण करण्यात आले. Dr. Pankaj Bhoyar शेवटी आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल भगत यांनी मानले. कार्यक्रमास नागरिक, रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.