नागपूर ,
Pachlegaonkar Maharaj -धर्म, राष्ट्र व समाजासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारे महान कर्मयोगी धर्मभास्कर पाचलेगावकर महाराज यांची पुण्यतिथी नुकतीच श्री मुक्तेश्वर आश्रम, सोमलवाडा येथे धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात शशिकांत आणि मृणालिनी वाघमारे यांच्या हस्ते अभिषेकाने झाली. यानंतर भजन, प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पराग कमाविसदार होते. प्रमुख वक्त्या छाया चांदेकर यांनी पाचलेगावकर महाराजांनी मुक्तेश्वर दल व हिंदू राष्ट्र सेनाच्या माध्यमातून जनजागृती साठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.
दत्ता भास्कर पोहरे यांनी महाराजांनी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी घेतलेल्या प्रयासांचे वर्णन करत, स्वतःच्या जीवनातील अनुभव ओजस्वी शैलीत कथन केले. Pachlegaonkar Maharajकार्यक्रमाच्या उत्तरार्धात दुपारची उपासना व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. श्री राम गर्गे व कार्यकारी मंडळातील पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भक्त, अनुयायी व समाजबांधव उपस्थित होते.
सौजन्य:उमाकांत रानडे संपर्क मित्र