इंदोर,
Raja Raghuvanshi murder case इंदोरमध्ये राहणाऱ्या व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजी गंगोटीबाई यांचे निधन झाले. शुक्रवारच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. पोती सोनमने केलेल्या कृत्यांची माहिती मिळाल्यानंतर त्या मानसिक धक्क्यात गेल्या होत्या. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.
सोनमचा भाऊ गोविंद रक्षाबंधनानिमित्त शिलाँगला जाण्याच्या तयारीत होता, पण आजीच्या निधनामुळे त्याचा प्रवास थांबवावा लागला. याआधी सोनमच्या प्रियकर राज कुशवाहा याच्या आजीचाही मृत्यू झाला होता. १८ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. आपल्या नातवाच्या गुन्ह्याची माहिती समजल्यावर त्या देखील धक्क्यात गेल्या होत्या आणि तो धक्का सहन न झाल्याने त्यांचा अंत झाला.
सोनम आणि Raja Raghuvanshi murder case तिच्या प्रियकराने कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला. शिलाँगमधील वकिलांनी राजा रघुवंशीच्या भावाला कळवले होते की गोविंद तिथे गेला होता. तो नेमका का गेला होता, याची निश्चित माहिती मात्र अजून समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी सोनमच्या वकिलांनी तिच्यासाठी आणि राजसाठी जामिनाची मागणी केली होती, पण ती याचिका कोर्टाने नामंजूर केली.या प्रकरणातील इंदोरच्या शिलाम जेम्ससह ग्वालियरच्या दोन आरोपींना जामिन मिळाल्याने गोविंदला वाटले की खूनाच्या कटात सहभागी असलेल्या सोनम आणि राजलाही जामिन मिळू शकतो. यासाठी त्याने सुरुवातीला वकिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळल्यानंतर ही शक्यता संपुष्टात आली.