स्वरा भास्करने ट्रोलर्सना दिले प्रत्युत्तर

    दिनांक :10-Aug-2025
Total Views |
मुंबई,
Swara Bhaskar बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या पती फहाद अहमदसोबतच्या सहभागामुळे चर्चेत आहे. दोघांनी नुकतेच टीव्ही शो ‘पति, पत्नी और पंगा’ मध्ये हजेरी लावली. शोमधील त्यांची केमिस्ट्री आणि फहाद यांचा लूक काही सोशल मीडिया वापरकर्त्यांना पसंत पडला नाही. यावर काहींनी फहाद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्याला स्वराने थेट प्रत्युत्तर दिले.
 

Swara Bhaskar  
स्वराने आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर काही ट्रोल कमेंट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले. एका कमेंटमध्ये लिहिले होते की, “परिणीती चोप्रा पीआरसाठी पतीला टॉक शोजमध्ये आणते, तशीच स्वरा आपल्या ‘डोंगरीच्या छपरी’ पतीला रिअॅलिटी शोमध्ये घेऊन आली. तो डोंगरीतील एखाद्या स्ट्रीट वेंडरसारखा दिसतो.”यावर प्रत्युत्तर देताना स्वरा म्हणाली, “हा मूर्ख जो स्वतःला गौरवशाली म्हणवतो, त्याला कदाचित माहीत नसेल की ‘छपरी’ हा एक जातिवादी अपमानास्पद शब्द आहे, जो ‘छप्पर’ किंवा फूसाच्या झोपड्या बांधणाऱ्या समुदायासाठी वापरला जातो. डोंगरीत किंवा कुठेही स्ट्रीट वेंडर असण्यात काहीही चुकीचे नाही. तुमचा मेंदू जातिवाद आणि वर्गवादाने भरलेला आहे, स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी 2023 मध्ये गुपचूप विवाह केला. सध्या ते राबिया नावाच्या मुलीचे पालक आहेत.