'महावतार नरसिम्हा'चा धमाका

11 Aug 2025 11:47:02
मुंबई 
Mahavatar Narasimha अश्विन कुमार दिग्दर्शित होम्बाले फिल्म्सचा पौराणिक अॅनिमेटेड चित्रपट महावतार नरसिम्हा’ बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. २५ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सलग तिसऱ्या आठवड्याच्या शेवटीही प्रेक्षकांची पहिली पसंती ठरला.
 

Mahavatar Narasimha 
पहिल्या आठवड्यात ४४.७५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात ७३.४ कोटींचा गल्ला जमवून, या चित्रपटाने तिसऱ्या विकेंडलाही चांगली कमाई केली. १५व्या दिवशी ७.५ कोटी आणि १६व्या दिवशी २०.२५ कोटींच्या कमाईनंतर, तिसऱ्या रविवारी म्हणजेच १७व्या दिवशी ‘महावतार नरसिंह’ ने तब्बल २२.७५ कोटींचा गल्ला जमवला.यासह, या चित्रपटाची १७ दिवसांची एकूण कमाई १६८.६५ कोटींवर पोहोचली असून, त्याने आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ च्या १६६.५८ कोटींच्या आयुष्यभराच्या कलेक्शनलाही मागे टाकले आहे. यामुळे, २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप ५ चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने पाचवा क्रमांक पटकावला आहे.
भगवान Mahavatar Narasimha विष्णूच्या तिसऱ्या आणि चौथ्या अवतारांच्या सामर्थ्यशाली कथांवर आधारित या चित्रपटाला आदित्य राज शर्मा, प्रियंका भंडारी आणि हरिप्रिया मट्टा यांनी आवाज दिला आहे. ‘महावतार नरसिंह’ चौथ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करेल, अशी अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0