मुंबई,
Sara Ali Khan बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान गेल्या सात वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. पदार्पणापूर्वीच तिच्या चुलबुली अंदाजाने ती चाहत्यांच्या मनात घर करून बसली होती. आज तिच्या हिट चित्रपटांचे एकूण कलेक्शन ५०० कोटींपेक्षा जास्त झाले आहे.
२०१८ मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिने अभिनयात पदार्पण केले. सुशांत सिंग राजपूतसोबतच्या या चित्रपटाने ६.८५ कोटींची ओपनिंग घेतली व ६६.५२ कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर आलेला रणवीर सिंगसोबतचा ‘सिम्बा’ हा ब्लॉकबस्टर ठरला आणि २४० कोटींची कमाई केली. पुढे ‘जरा हटके जरा बच्चे’ ने ८८ कोटींचा गल्ला जमवला, तर ‘स्काय फोर्स’ ने १३१ कोटींचा व्यवसाय केला.
याशिवाय ‘लव्ह आज कल’, ‘कुली नंबर १’, ‘अतरंगी रे’, ‘गॅसलाईट’, ‘मर्डर मुबारक’, ‘ए वतन मेरे वतन’ अशा विविध चित्रपटांतून तिने आपली ओळख निर्माण केली. तिचा अलीकडचा ‘मेट्रो… दिस डेज’ हा चित्रपट ४ जुलै रोजी प्रदर्शित झाला असून, त्याच्या एकूण कलेक्शनची माहिती अद्याप उपलब्ध नाही.सारा अली खान ही अभिनेता सैफ अली खान व अमृता सिंग यांची कन्या असून तिचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ रोजी झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या साराचे बालपणीचे अभिनयाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पालकांच्या थेट मदतीशिवाय तिने चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.