'या' मराठी अभिनेताचा भीषण अपघात

६-७ तास ट्रकमधून प्रवास करत मुंबई गाठली

    दिनांक :11-Aug-2025
Total Views |
मुंबई,
Suyash Tilak accident 'का रे दुरावा' मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला मराठी अभिनेता सुयश टिळक अलीकडेच एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावला. या अपघाताची माहिती स्वतः सुयशने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे.सुयशने सांगितले की, हा अपघात खूपच दुर्दैवी होता, पण सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, गाडीचे मोठे नुकसान झाल्याने ती पूर्णपणे बंद पडली आणि अपघाताच्या ठिकाणी कोणतीही मदत तत्काळ मिळाली नाही.
 

 Suyash Tilak accident 
अपघातानंतर Suyash Tilak accident मुंबईकडे परतण्यासाठी त्याला तब्बल ६ ते ७ तास ट्रकमधून प्रवास करावा लागला. सुयश म्हणाला, “हा माझ्या आयुष्यातील वाहन न चालवता केलेला सर्वात लांब प्रवास होता.”प्रथम, मदतीसाठी तासभर वाट पाहावी लागली. शेवटी एक टोइंग गाडी आली आणि ड्रायव्हरने त्याला ट्रकमध्ये बसण्याचा सल्ला दिला. या प्रवासात एसी नसलेल्या शांत गाडीत तो बसून होता. रस्त्याने जाताना अनेक लोक ट्रककडे पाहून हसत होते, कुतूहलाने बघत होते, पण सुयशने त्यावर संयम ठेवत परिस्थितीचा स्वीकार केला.
 
 
या संपूर्ण Suyash Tilak accident प्रवासादरम्यान त्याने पुस्तक वाचले, संगीत ऐकले, थोडी झोप घेतली आणि या वेगळ्या अनुभवाचा आनंद घेतला.तो पुढे म्हणतो, “कधी कधी आयुष्य तुम्हाला खेचत नेतं, तुम्हाला आवडो वा न आवडो. तुम्ही तो प्रवास रागाने घालवू शकता… किंवा खिडकी उघडून खोल श्वास घेऊन एन्जॉय करू शकता.”सुयशने या अनुभवाचा एक मिनी व्लॉग देखील तयार केला असून, त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजते आहे. चाहत्यांनी त्याच्या सुरक्षिततेबद्दल दिलासा व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.