नागपूर,
tree plantation अलिबाग येथील रेवदंडाच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने आणि पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गट ग्रामपंचायत, वेळा (हरिश्चंद्र) येथे वृक्षारोपण करण्यात आले. खापरी पुनर्वसन ते शंकरपूर रोड या परिसरात हा कार्यक्रम पार पडला.
वृक्षारोपण कार्यक्रमास रवी ग. पराते, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर (अतिरिक्त कार्यभार), अधीक्षक अभियंता, भंडारा सिंचन मंडळ, भंडारा, रूपराप शिंगणे, माजी जिल्हा परिषद सदस्य, नागपूर, केशव सोनटक्के, माजी सरपंच, खापरी, शेषराव चरडे, माजी ग्राम पंचायत सदस्य, खापरी, गट ग्रामपंचायत, वेळा (हरिश्चंद्र) येथील ग्रामस्थ सोपान परसराम चौधरी, आशिष तानबाजी मस्के आणि परिसरातील इतर मान्यवर प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी एकूण ५३ नवीन झाडे लोखंडी ट्रीगार्डसह लावण्यात आली. प्रतिष्ठानचे १५० श्रीसदस्य, स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने वृक्षारोपणात सहभागी झाले. त्यांनी सर्व झाडांचे नियमित संगोपन आणि संवर्धन सातत्याने करण्याचे वचन दिले आहे.tree-plantation याआधी हुडकेश्वर रोड परिसरातही प्रतिष्ठानतर्फे एकूण २५० झाडे लावण्यात आली आहे.