वणी येथे मंदिर स्वच्छता व तुळसरोपण उपक्रमाला प्रारंभ

    दिनांक :12-Aug-2025
Total Views |
वणी,
cleanliness-campaign-vani : दैनिक तरुण भारततर्फे मंदिर स्वच्छता व तुळशीच्या झाडांचे रोपण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात येथील प्राचीन हेमाडपंथी काळाराम मंदिरात मंदिराच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर या मंदिर परिसरात तुळशीच्या झाडांचे रोपण करण्यात आले. या प्रसंगी तरुण भारत तालुका प्रतिनिधी गजानन कासावार व रवी बेलुरकर, माजी नगर परिषद अध्यक्ष आशा टोंगे, सतीश बदखल, पंकज कासावार व मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.
 
 

y12Aug-Wani