आजनसरा येथे आज तुळस लावा अभियानाचा शुभारंभ

    दिनांक :12-Aug-2025
Total Views |
आजनसरा,
Tulsi Lava Campaign श्री नरकेसरी प्रकाशनचे अमृत महोत्सवी वर्ष व दैनिक तरुण भारतच्या शताब्दी वर्षानिमित्त विदर्भात तुळशी लावा पर्यावरण वाचवा या अभियानाच्या आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज १३ रोजी अजून सराईतील संत भोजाजी महाराज यांच्या मंदिरातून होणार आहे.
 
 
Tulsi Lava Campaign
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे संचालक समीर गौतम राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, हिंगणघाट चे आमदार समीर कुणावार, वणानागरी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर निरमेश कोठारी, संत भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्वत तर प्रमुख वक्ते म्हणून ह भ प पल्लवी पुरोहित यांची उपस्थिती राहणार आहे. Tulsi Lava Campaign या कार्यक्रमाला जास्तीत जास्त पर्यावरण स्नेही उपस्थित राहण्याचे आवाहन तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी सतीश वखरे, आजनसरा येथील प्रतिनिधी डॉ. संदीप लोंढे व मठ मंदिर समाज भवन स्वच्छता अभियान समितीने केले आहे.