बेंगळुरू,
bangalore-murder-case कर्नाटकमधील बेंगळुरूपासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेल्या तुमकुरू जिल्ह्यातील चिंपुगनहल्ली येथे घडलेल्या या रक्तरंजित घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. ४२ वर्षीय लक्ष्मीदेवम्माचा खून करून तिचे १९ तुकडे करण्यात आले आणि प्रत्येक तुकडा वेगवेगळ्या १९ ठिकाणी टाकण्यात आला. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास उलगडत, महिलेच्या जाव्यासह तीन जणांना अटक केली आहे.

प्रथम, चिंपुगनहल्ली परिसरात मृतदेहाचे काही भाग आढळले. फॉरेन्सिक तपासात तो एका महिलेचा असल्याचे निश्चित झाले. तुकड्यांवर सापडलेल्या दागिन्यांवरून हत्या लोभासाठी नसल्याचे पोलिसांनी ओळखले. त्यानंतर हरवलेल्या महिलांची माहिती गोळा करत तपास सुरू झाला. तपासादरम्यान समजले की बेल्लावी येथील लक्ष्मीदेवम्मा ही ३ ऑगस्टपासून बेपत्ता आहेत. त्यांचा पती बसवराजने याची तक्रार नोंदवली होती. शेवटचे तिला हनुमंतपूरा येथे मुलगी तेजस्वीच्या घरी पाहिले गेले होते. प्रारंभी शरीराचे काही भाग मिळाले, मात्र डोके सापडले नव्हते. पुढील तपासात तेही पोलिसांच्या हाती लागले आणि मृतदेहाची ओळख पटली. त्या दिवशी एक पांढरी मारुती सुझुकी ब्रेझा हनुमंतपूराहून कोराटगेरेकडे गेल्याचे सीसीटीव्हीत दिसले. नंबर प्लेट बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिस उर्दीगेरे गावातील शेतकरी सतीशपर्यंत पोहोचले. bangalore-murder-case फोन रेकॉर्ड्स आणि स्थानिकांच्या माहितीद्वारे पोलिसांनी सतीश आणि त्याचा चुलत भाऊ किरण यांना होरानाडू मंदिरात पकडले.
तपासातून धक्कादायक उघडकी झाली कार सहा महिन्यांपूर्वी डॉ. रामचंद्रय्य एस. च्या पैशाने खरेदी करण्यात आली होती, पण ती सतीशच्या नावावर होती. डॉ. रामचंद्रय्य यांनी लक्ष्मीदेवम्माच्या मुलगी तेजस्वीशी विवाह केला होता. ४७ वर्षीय डॉक्टरचे हे दुसरे लग्न होते, आणि ते तेजस्वीपेक्षा २० वर्षांनी वयस्कर होते. दोघांना तीन वर्षांचा मुलगा आहे, मात्र डॉक्टरचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला नव्हता. त्याला भीती होती की सासूच्या वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप करून कुटुंब उद्ध्वस्त करेल. याच भीतीतून त्यांनी सासूच्या हत्येची सहा महिने आधीच योजना आखली. सतीश आणि किरणला प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले, त्यापैकी ५०,००० रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले. ३ ऑगस्ट रोजी लक्ष्मीदेवम्मा मुलीच्या घरून निघत असताना, डॉ. रामचंद्रय्यनी तिला घरी सोडण्याचा बहाणा करून गाडीत बसवले. त्यावेळी सतीश आणि किरणही सोबत होते. bangalore-murder-case गाडीत बसताच दोघांनी तिचा गळा दाबून खून केला. दुसऱ्या दिवशी धारदार शस्त्राने मृतदेहाचे १९ तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले. पूर्वी या प्रकरणाचा संबंध मानवी बलिदानाशी जोडला जात होता, मात्र एसपी अशोक के.व्ही. यांनी ती शक्यता फेटाळून लावली. हे प्रकरण केवळ वैयक्तिक राग आणि भीतीतून केलेली निर्दयी हत्या असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.