मुंबई,
Shinde's Ladki Soon scheme राज्यात विधानसभा निवडणुकीत मोठी भूमिका बजावणाऱ्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लाडकी सून' या नव्या मोहिमेची घोषणा केली आहे. १८ ऑगस्ट २०२५ रोजी ठाणे येथे ‘खेळ मंगळागौरीचा’ या विशेष कार्यक्रमात ही योजना औपचारिकपणे जाहीर करण्यात आली. सासरच्या घरात छळाला सामोऱ्या जाणाऱ्या सुनांसाठी ही योजना मोठा आधार ठरणार असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात महिला आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना शिंदेंनी सांगितले की, "लाडकी बहीण योजना जशी महिलांसाठी आदर्श ठरली, तसंच आता 'लाडकी सून' ही मोहीम सुरू करत आहोत. आपल्या घरात लेक लाडकी असते, तशीच सूनही असावी, तिला सन्मान मिळायला हवा. जे असे करणार नाहीत त्यांना आता शिवसेना महिला आघाडी धडा शिकवेल.

या मोहिमेअंतर्गत घरगुती हिंसाचार, शारीरिक वा मानसिक छळाचा सामना करणाऱ्या सुनांना तात्काळ मदत आणि संरक्षण देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ‘लाडकी सून, सुरक्षित सून’ हे अभियान शिंदे गटाच्या शिवसेनेचं वचन असल्याचं शिंदेंनी ठामपणे नमूद केलं. यासाठी ८८२८८६२२८८ आणि ८८२८८९२२८८ हे हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. लवकरच व्हॉट्सअॅप ग्रुप, ई-मेल आयडीच्या माध्यमातूनही तक्रारी नोंदवता येणार आहेत. या तक्रारी गोपनीय ठेवण्यात येणार असून, तात्काळ प्रतिसाद देण्याची हमी देण्यात आली आहे.
कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची आठवण करून दिली. "त्यांनी शिकवलं की एकदा दिलेला शब्द कधीही फिरवायचा नाही. आम्ही तुमच्यासाठी दिलेला शब्द पाळला आहे आणि पुढेही पाळू. जेव्हा-जेव्हा अन्याय होईल, तेव्हा शिवसेना Shinde's Ladki Soon scheme महिला आघाडी रणरागिणीसारखी समोर उभी राहील," असं ते म्हणाले. या योजनेची जबाबदारी ठाणे जिल्हा महिला संघटिका आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. ‘लाडकी सून’ अभियानाची सुरुवातही धर्मवीर आनंद दिघे यांच्या ‘आनंद आश्रम’ येथूनच करण्यात आली, याकडेही शिंदेंनी लक्ष वेधले.
यावेळी त्यांनी 'उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान' या आरोग्य तपासणी उपक्रमाचाही उल्लेख करत, महिलांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असं आवाहन केलं. महिला घरासाठी सर्व काही करतात पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या मोहिमेमुळे त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाणार आहे, असं स्पष्ट करत त्यांनी समाजात सासरच्या घरात सुनांवर होणाऱ्या अन्यायाला आता पूर्णविराम मिळेल, Shinde's Ladki Soon scheme असा विश्वासही व्यक्त केला. लाडकी सून' योजना ही शिंदे गटाच्या शिवसेनेची आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरणार असून, राज्यातील महिलांना मानसिक, सामाजिक आणि वैधानिक आधार देण्याच्या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल असल्याचं मानलं जात आहे.