व्यापार युद्धात भारताच्या क्षमता

    दिनांक :19-Aug-2025
Total Views |
 
वेध
 
पुंडलिक आंबटकर
trade war रशियाकडून कच्चेतेल खरेदी करून भारत इतर देशांना विकत असल्याच्या सबबीवरअमेरिकेने व्यापार युद्ध छेडले आहे. वास्तविक अमेरिकेला भारतीय बाजारपेठकाबीज करायची आहे आणि त्यांना प्रामुख्याने आपली कृषी उत्पादने भारतात विकायचीआहे. असे झाल्यास भारतीय शेतकरी नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेने भारतीय उत्पादनांवरआयातशुल्क लादून दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु, भारतीय शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वत: एक व्यापारी आहे. त्यामुळे ते होईल त्या मार्गाने आपल्या देशाला आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करीतआहे. अमेरिका 30 ट्रिलियन डॉलर्सची महासत्ता आहे. परंतु, या देशावर वेगवेगळ्या प्रकारचे तब्बल 37 ट्रिलियन डॉलर्स इतके कर्ज आहे! भारत झपाट्याने वेगवेगळी शिखरे पादाक्रांत करीत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकन बनावटीचे इंग्लंडचे एक अत्याधुनिक लढाऊ विमान भारतीय हद्दीत घुसले होते. परंतु, भारतीय तंत्रज्ञानाने हे विमान काही क्षणातच तांत्रिकदृष्ट्या निकामी केले. तेव्हापासून अमेरिकेसह नाटो देशांची झोप उडाली आहे.
 
 
 

xcbgvjhgj  
 
 
 
आता ट्रम्प यांनी कुठलाही दूरगामी विचार न करता भारतआणि ब्राझिलवर व्यापार युद्ध लादले आहे. त्यामुळे जागतिक पटलावर नवीसमीकरणे तयार होऊ लागली आहे. अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागिदार आहे. 2024-25 या वर्षात भारत-अमेरिकेत तब्बल 124 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. 2030 पर्यंत हा व्यापार 500 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट दोन्ही देशांचे होते. परंतु, राष्ट्रवादी विचारसरणीचे ट्रम्प निवडून आले आणि एकाएकीसर्व चित्रच पालटले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात भारतीय वंशाच्या नागरिकांचा मोठा वाटा आहे. प्रचार काळात ट्रम्प यांनी या नागरिकांना अनेक आश्वासने दिलीत. परंतु, निवडून आल्या नंतर त्यांची वागणूक पाहता ‘हे तेच ट्रम्प आहेत का?’ असा प्रश्न पडतो.
 
भारत सर्वात मोठा तांदूळ निर्यातदारआहे. भारतात पिकणाऱ्या तांदळाला जगात विशेष मागणी आहे. यामुळे भारतीय शेतकऱ्यां च्या पदरी चार पैसे अधिकचे पडतात. ट्रम्प यांच्या व्यापार युद्धाचा फटका तांदूळ उत्पादकां नाही बसणार आहे. अमेरिकेत सोयाबीन, मका, इथेनॉल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होते. अमेरिकेची कृषी उत्पादने उच्चत्तम हायब्रीड श्रेणीतील असतात. तिथे प्रचंड उत्पादन होत असल्यानेही उत्पादने खूपच स्वस्त असतात.अशा परिस्थितीत भारताने अमेरिकेची कृषी उत्पादने आयात केली चतर भारतीय कृषीक्षेत्राचा पाया ढासळल्या शिवाय राहणार नाही. आधीच सोयाबीन उत्पादक नापिकीमुळे मोठ्याप्रमाणात आत्महत्या करीत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेची कृषी उत्पादने आयात केल्यास भारतातील गोरगरीब शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. मात्र, आता देशात कणखर आणि सक्षम सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि यात सरकार नक्कीच यशस्वी होतील. जगात भारतीय तंत्रज्ञानाचा डंका झडत आहे.परंतु, आजही अनेक बाबतीत आपण पिछाडीवर आहोत. लढाऊ विमानांचे इंजिन आपल्याला किमान आज तरी इतरांकडून प्राप्त करावे लागते. भारताने अमेरिकेचा दबाव झुगारल्याने ट्रम्प नव्याने काही निर्णय घेऊ शकतात. असे झालेच तर गूगल, फेसबुक, युट्यूब, इन्स्टा आदींचे नवेपर्याय आपल्याला शोधावे लागतील. या कंपन्या अमेरिकेच्या आहेत आणि आज त्यांना सर्वाधिक कमाई भारतातूनच प्राप्त होते. प्रत्युत्तर म्हणून भारताला या कंपन्यांवर विशिष्टशुल्क आकारता येईल. परंतु, तसे करणे धोक्याचे ठरू शकते. त्यापूर्वी पर्यायी व्यवस्था निर्माण करावी लागेल आणि या दिशेने प्रयत्न सुरू झाल्याचे समजते. परंतु, कुठल्याही तंत्रज्ञानाची कॉपी करून आपण यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांना ठोस असे पर्यायी स्वदेशी तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे लागतील.trade war तेव्हाच त्यांचा विश्वास बसेल आणि आत्मनिर्भर भारत या संल्पनेचे उद्दिष्ट वेगाने मार्गी लागेल. 1 जुलै 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया हा दूरगामी कार्यक्रम सुरू केला आणि पाहता पाहता संपूर्ण देश डिजिटल करून दाखविला. भारतीय नागरिकांनी युपीआय आणि फोन पे या पर्यायांचाच वापर करावा. कारण, या सुविधा भारतीय आहेत. गूगलपे व अन्य कमी दर्जाच्या विदेशी सुविधा तसेच वस्तूंचा वापर टाळला पाहिजे. सरकारकडून तसे आवाहन करण्यात येत आहे आणि संकटकाळात सरकारच्या पाठीशी राहणे हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्यच आहे.
9881716027