रोटरी लब हिंगणघाटचा तुळस दान उपक्रम

    दिनांक :19-Aug-2025
Total Views |
हिंगणघाट, 
rotary-lab-hinganghat : श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचा अमृत महोत्सव व तरुण भारतच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त तुळस लावा, पर्यावरण वाचवा या आवाहनाला रोटरी लब हिंगणघाट यांच्या वतीने प्रतिसाद देत तुळशीचे ११०० रोपटं भेट देण्यात आली.
 
 
jlk
 
 
या उपक्रमासाठी स्थानिक स्नेहल किसान नर्सरीचे शुभांक, शशांक तसेच दिगंबर खांडरे यांनी रोपं उपलब्ध करून दिली. तुळस लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश देत रोटरी लबने नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होऊन लोकांना प्रेरणा मिळते असल्याचे रोटरी लबच्या वतीने सांगण्यात आले.