पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते तुळस रोपण

19 Aug 2025 14:56:32
अकोला,
Tulsi plantation by Akash Fundkar दै. तरुण भारतचे शताब्दी तर श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समाज मंदिर स्वच्छता व तुळस रोपण उपक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी सहभाग नोंदविला. गौरक्षण मार्गावरील अष्टसिद्धी हनुमान मंदिराच्या परिसरात शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी त्यांनी तुळस रोपण केले.
 
 

Tulsi plantation by Akash Fundkar 
 
भारतीय संस्कृतीत तुळशीचे विशेष महत्त्व आहे. २४ तास ऑक्सीजन देणारी तुळस आयुर्वेद दृष्ट्या आरोग्यासाठी देखील उपयोगी आहे. या तुळशीचे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तर घरोघरी देखील संवर्धन व्हावे असे मत यावेळी आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला रामेश्वर फुंडकर, Tulsi plantation by Akash Fundkar श्रीकांत कोंडोलीकर, अ‍ॅड. आशीष फुंडकर, स्वानंंद कोंडोलीकर, अभयसिंह राजपूत, दिलीप राऊत, संजय परभणीकर, डॉ. गजानन वाघोडे, जयंत फाटे, दिनेश फाटे, शंतनू देशपांडे, अविनाश गाडगे, सुरेश गाडगे, डॉ. गौरव रत्नपारखी, दिगंबर कोरडे, विजय युतकार, अ‍ॅड. गजानन भोपळे, अण्णासाहेब आखरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती
Powered By Sangraha 9.0