काँग्रेसचा तमाशा!

    दिनांक :02-Aug-2025
Total Views |
mp-praniti-shinde सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला ‘तमाशा’ म्हटले आहे. त्या म्हणाल्या, ‘‘सरकार सत्य लपवून फक्त माध्यमांमध्ये प्रशंसा मिळवत आहे. प्रत्यक्षात, ऑपरेशन सिंदूर हा एक तमाशा होता. ऑपरेशन सिंदूरमधून देशाला काय फायदा झाला? या कारवाईत किती दहशतवादी पकडले गेले? पाकिस्तानने भारताची किती विमाने पाडली? या कारवाईत झालेल्या चुकांसाठी कोण जबाबदार आहे?’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. खरं तर सैन्याने याबाबत पत्रकार परिषद घेऊन अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत. कदाचित प्रणिती शिंदेंना भाषण लिहून देणाऱ्यानी याबाबत माहिती मिळवलेली दिसत नाही. अर्थात प्रणिती शिंदे स्वतःच्या मनाने काही बोलत नाहीत. त्यांना त्यातलं किती कळतं हा संशोधनाचा विषय आहे. याचं कारण असं की ‘‘भगवा दहशतवाद‘‘ ही संकल्पना प्रणिती यांचे तीर्थरुप सुशीलकुमार शिंदे यांनी मांडली होती. हे काँग्रेसचं कारस्थान होतं अशी कबुली स्वतः शिंदेंनीच दिली आहे. हायकमांड आणि ज्येष्ठांनी सांगितल्यामुळे त्यांनी असे विधान केल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे सुशीलकुमार शिंदे हे खाल्ल्या मिठाला जागणारे आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या देखील खाल्ल्या मिठाला जागणाऱ्या असू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच इथे स्पष्ट करावेसे वाटते की जरी प्रणिती यांनी ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हटले असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसनेच तमाशा चालवलेला आहे, असं म्हणायला बराच वाव आहे.
 

प्रणिती  
 
 
 
नुकताच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला आणि सर्व हिंदू आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण हे भारताच्या इतिहासात एक गंभीर वळण घेऊन आलेलं प्रकरण आहे, ज्यामध्ये केवळ निष्पाप लोकांचा मृत्यूच झाला नाही, तर हिंदू समाजावर ‘‘हिंदू दहशतवाद‘‘ नावाचा एक खोटा शिक्का मारण्याचा कट रचला गेला. या प्रकरणातून काँग्रेसने हिंदुत्वाला बदनाम करण्याचा एक योजनाबद्ध डाव आखला. 2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सुरुवातीस मुस्लिम अतिरेक्यांवर संशय घेतला गेला होता. मात्र, एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘‘प्रत्येक वेळी मुसलमानच कसा पकडला जातो?‘‘ असा प्रश्नचिन्ह निर्माण केला आणि जणू जादूची काडी फिरवल्यासारखे मुस्लिम आरोपी गायब झाले आणि त्या जागी हिंदू आरोपी आले. विशेष म्हणजे या सर्व काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा गृहमंत्री होता. शरद पवारांचं राजकारण रोमांचक आहे. त्यांनी कधीही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरला नाही, मात्र गृहमंत्री त्यांच्या पक्षाचा असेल यासाठी ते आग्रही असायचे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही गृहमंत्रीपद त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलं होतं. त्यातूनच बार मालकांकडून 100 कोटींची वसूली, जिलेटिन कांड्याचा कांड, सुशांत-दिशा, मनसुख हिरेन असे अनेक संशयासद मृत्यू, सचिन वाझे, अनंत करमुसे अपहरण व मारहाण आणि इतर बरीच प्रकरणे समोर आली. लक्षात घ्या अत्याधुनिक युगात इतका घोळ घातला गेला तर जेव्हा सोशल मीडिया वगैरे नव्हता तेव्हा काय काय घडलं असेल, याचा विचार करुनच अंगावर काटा येतो. तर मालेगाव स्फोट प्रकरणात काही दिवसांतच काँग्रेस सरकारच्या दबावाखाली एटीएसने एक वेगळेच कथानक तयार केले. या कथानकात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासारख्या व्यक्तींवर अतिरेकी असल्याचे आरोप ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, या व्यक्तींना कोणताही ठोस पुरावा नसताना वर्षानुवर्षे तुरुंगात डांबून ठेवण्यात आले. त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला.
‘हिंदू दहशतवाद’ ही संकल्पना काँग्रेसने केवळ मुस्लिम तुष्टीकरणासाठी आणि जिहादी दहशतवादाच्या वास्तवावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी निर्माण केली असली तरी त्यांचा मूळ उद्देश मुस्लिम तुष्टीकरणातून निवडणूक जिंकणे असा होता. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसचे काही नेते जाणीवपूर्वक हे कथानक जनतेसमोर मांडत होते. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे संपूर्ण हिंदू समाजाला संशयाच्या छायेत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र अखेर सत्य जगासमोर आलेच. निवृत्त पोलिस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकताना सांगितले की, एटीएसने खोटे पुरावे तयार करून काही आरोपींना अडकवले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, काँग्रेस सरकारच्या आदेशावरून हे सर्व घडले. मुजावर यांच्या म्हणण्यानुसार, मालेगाव बॉम्बस्फोटानंतर सापडलेले काही खरे आरोपी सोडून दिले गेले आणि त्यांच्या जागी निर्दोष हिंदू व्यक्तींना अडकवले गेले. या खोट्या कथानकाचा सर्वात घृणास्पद भाग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना या कटात अडकवण्याचा प्रयत्न होता. काँग्रेसच्या माध्यमांमार्फत असे दाखवले गेले की, मालेगाव स्फोटामागे काही संघटनेचा हात आहे. यामागचा उद्देश स्पष्ट होता, तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संपूर्ण हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीला दहशतवादाच्या छायेत आणणे. पण वेळ येताच कोर्टाने आणि तपास संस्थांनी या आरोपांना निराधार ठरवलं. खरंतर यासाठी मेहबूब मुजावर यांचे आभार मानायला हवे.mp-praniti-shinde मात्र या कटात सहभागी न झाल्याने मेहबूब यांनाही त्रास देण्यात आला, त्यांच्यावरही खोटे आरोप ठेवण्यात आले.
सप्टेंबरमध्ये मालेगाव ब्लास्ट झाला आणि 2008 च्या नोव्हेंबरमध्ये आणखी एक भयानक घडली, ती म्हणजे मुंबई दहशतवादी हल्ला. यात हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हत्येचे आरोपही हिंदू समाजावर टाकण्यात आले. त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट अशी की कसाब व त्याच्या साथीदारांनी केलेल्या जिहादी हल्ल्याचे खापर हिंदू समाजावर मारण्याचा प्रयत्न होणार होता. जर तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडलं नसतं तर ते सगळे अतिरेकी हिंदू होते असं दाखवण्याचा प्रयत्न झाला असता. या षडयंत्राचा भाग म्हणूनच हिंदूंवर करकरेंच्या हत्येचा आरोप टाकण्यात आला. भाजप नेते अवघूट वाघ यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत ते म्हणाले की, ‘‘प्रज्ञा ठाकूर यांना पकडून संपूर्ण हिंदू संत समाज, मेजर उपाध्यय आणि कर्नल पुरोहित यांना पकडून संपूर्ण लष्कर आणि अभिनव भारतला गुंतवून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कट्टर हिंदुत्वनिष्ठ अशी सावरकरांची फौज या सर्वांना बदनाम करण्याचं कारस्थान जर कोणी रचलं असेल तर त्या माणसाचं नाव आहे शरदचंद्र पवार.‘‘ म्हणजे काँग्रेस व त्यांच्या संस्कृतीतील लोकांना भारतीय समाज रचनाच मोडून पाडायची होती. हिंदू संतांना आरोपी बनवलं तर हिंदुत्वाचा पाया ढासळेल, लष्करातील लोकांना पकडलं तर भारतीय संरक्षण यंत्रणा कोलमडून पडेल आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अडकवलं तर समाजरचना विस्कळीत होईल. या तिन्ही घटकांमुळे भारत देश सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. या घटकांवर हल्ला चढवला तर भारतीय व्यवस्था ढासळेल. म्हणजे केवढं मोठं षडयंत्र होतं! हे केवळ निवडणूक जिकण्यासाठी असेल तर हे पाशवी आहे.
या प्रकरणाबाबत एनआयए कोर्टाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, आरोपींविरुद्ध पुरावा अपुरा असून त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. या निर्णयानंतर हे स्पष्ट झाले की काँग्रेस सरकारने निव्वळ राजकीय हेतूने निर्दोष हिंदूंना अतिरेकी ठरवले होते. हा खरंतर भारतीय न्यायप्रणालीवरचा विश्वास डळमळीत करणारा प्रकार होता. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, ‘‘हिंदू कधीही टेररिस्ट होऊ शकत नाही.’’ हे विधान केवळ राजकीय नव्हे, तर ऐतिहासिक सत्य आहे. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात हिंदूंनी अन्यायाविरुद्ध लढा दिला, पण कधीही अतिरेकी मार्ग अवलंबला नाही. हिंदू क्रांतिकारक असतो, अतिरेकी नव्हे. या संपूर्ण प्रकरणातून काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आला आहे. एक असा पक्ष जो केवळ मतांसाठी धर्माचा वापर करतो, तुष्टीकरण करत हिंदूंना खलनायक ठरवतो, आणि ज्याला भारताच्या संस्कृतीबद्दल प्रेम नाही, तर केवळ सत्तेची हाव आहे. जेव्हा काँग्रेसने ‘हिंदू दहशतवाद’ हे पाशवी रूप मांडलं, तेव्हा त्यांनी संपूर्ण सनातन धर्मालाच कलंकित केलं. संसदेत प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला ‘‘तमाशा‘‘ म्हटलं, कारण त्या ज्या संस्कृतीतून येतात ती संस्कृतीच मुळात तमाशा आहे. काँग्रेस या संस्कृतीने हा तमाशा इतकी वर्षे सुरु ठेवला. न्यायालयाने हा तमाशा बंद पाडला. पण काँग्रेस आणि त्यांचे मालक नकली गांधी कुटुंब पुन्हा नवा तमाशा सुरु करतील.mp-praniti-shinde जेव्हा हे गांधी कुटुंब आपल्याच भारतावर, संस्कृतीवर, प्राणपणाने लढणाèया बलिदान देणाèया सैन्यदलावर हल्ला चढवेल तेव्हा त्यांच्या खल्ल्या मिठाला जागणारे नेते म्हणजेच राहुल व सोनिया गांधींच्या तालावर नाचणारे नकलाकार पुन्हा एकदा थिरकतील आणि हा तमाशा सुरुच राहील. म्हणूनच हिंदू समाजाने आता यापुढे सदैव ‘‘अखंड सावधान असावें । दुश्चित कदापि नसावे ।‘‘
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री