शेवटच्या क्षणापर्यंत प्रमिलमावशी राहिल्या कार्यमग्न, कर्तव्यदक्ष

02 Aug 2025 16:36:07
नागपूर
Pramilamavshi वंदनीय प्रमिलमावशी गेल्या तेव्हा 97 वर्षांच्या हाेत्या. शरीर थकले हाेते. परंतु राष्ट्र सेविका समितीने घालून दिलेली शिस्त नसानसांत भिनली हाेती. त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीत दिनक्रम चुकत नव्हता. सकाळचे नित्याेपचार आटाेपून वास्तव्य असलेल्या अहिल्या मंदिरातील शाखेत हजर हाेणे आणि देवी अष्टभुजेचे दर्शन हा त्यांचा न चुकलेला दिनक्रम हाेता. गुरुवारी सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्याेत मालविली त्या दिवशी प्रकृती अस्वास्थ्याने शाखेत जाणे शक्य नसते तरी खाेलीतच त्यांनी अंथरुणावर समितीची प्रार्थना म्हटली. शेवटच्या श्वासापर्यंत त्या अविरत कार्यमग्न आणि कर्तव्यदक्ष राहिल्या.
 

Pramilamavshi 
पण त्या Pramilamavshi  दिवशी देवी अष्टभुजेचे दर्शन राहूनच गेले. विशेष म्हणजे त्यांच्याच संकल्पनेतून अहल्या देवी अष्टभुजेची स्थापना 1965 साली करण्यात आली हाेती. राष्ट्र सेविका समितीचे कार्य धंताेली येथील अहिल्या मंदिरातून सुरू झाले तेव्हापासून पूर्ण वेळ प्रमिलमावशी या अहिल्या मंदिरातच वास्तव्यास हाेत्या. स्त्री ही शक्तीचे प्रतिक आहे हे त्या जाणून हाेत्या. या शक्तीचे मूर्त रूप अष्टभुजा रुपातून प्रकटावे या भावनेतून त्यांनी देवीच्या अष्टभुजा स्वरूपातील मूर्तीची स्थापना करवून घेतली आणि सकाळच्या शाखेनंतर देवीची नित्याेपचार पूजा हा अहल्या मंदिराच्या परंपरेचा भागच झाला. 1978 ते 2003 अशी जवळपास 25 वर्ष त्या राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यवाहिका हाेत्या. ेब्रुवारी 2003 पासून सहप्रमुख संचालिका तर 22 जुलै 2006 ते 2012 या वर्षापर्यंत त्या प्रमुख संचालिका हाेत्या. 20 जुलै 2012 पासून त्यांनी हा कार्यभार विद्यमान संचालिका शांताक्का यांना साेपविला.
 
 
गेल्या काही Pramilamavshi  दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजुक हाेती. पण याही स्थितीत देवीचे दर्शन चुकत नव्हते. त्यांचा वाहन चालक विठ्ठल काकड हा त्यांना नियमित सकाळी व्हिलचेअर वर बसवून देवी अष्टभुजेच्या दर्शनासाठी आणायचे. त्या ही दिवशी तसेच हाेणार हाेते. परतु, काही कामानिमित्त काॅटन मार्केट ला जायचे असल्याने मी आल्यावर तुम्हाला दर्शनासाठी नेताे असे सांगून विठ्ठल गेले आणि त्याच दरम्यान मावशींनी आपली इहलाेकीची यात्रा संपविली आणि त्यांचे देवी अष्टभुजेचे दर्शन राहून गेले.
Powered By Sangraha 9.0