आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ आयुर्वेद महाविद्यालयात तुळस कार्यशाळा व जनजागृती

* जिल्ह्यातील पहिली कार्यशाळा

    दिनांक :20-Aug-2025
Total Views |
बुलढाणा, 
Buldhana News : तरूण भारत शतकी वर्ष श्री नरकेसरी प्रकाशन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंदिर स्वच्छता अभियान तुळस लावा पर्यावरण वाचवा उपक्रमाद्वारे दि. २० ऑगस्ट रोजी बुलढाणा येथील आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ आयुर्वेद महाविद्यालय बुलढाणा येथे तुळस रोपण व कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी तुळस लावा पर्यावरण जागवा असा जयघोष करण्यात आला.
 

OLK 
 
 
 
जिल्ह्यातील हि पहिली कार्यशाळा आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. उबरहंडे व प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर दै. तरूण भारतचे जिल्हा प्रतिनीधी नितीर शिरसाट हे होते. डॉ. प्रवीण पाटील, स्वप्नील धोरण, डॉ. भागवत वसे उपस्थित होते.
 
 
कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत जिल्हा प्रतिनिधी नितीन शिरसाट यांनी तुळस ही आपल्या दैनंदिन जीवनात कशी उपयोगी आहे. व तुळशीचे धार्मिक आणि शारिरिक महत्व सांगितले र्ककरोगा सारख्या दूर्धर आजारावर तुळस ही उपयुक्त आहे. असे त्यांनी सांगितले. यानंतर तुळशीचे विविध घटकात महत्व यावरचे सादरीकरण मोठ्या पडद्यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जान्हवी वाणी, आदिती कोकणे यांनी केले.
 
 
या कार्यशाळेला डॉ. वर्षा सरसांडे,डॉ. शैलजा मोहरीर, डॉ. कांचन अंभोरे, डॉ. विवेक राजपूत, डॉ. सौनाली कठारे, डॉ. प्रणाली काळे, डॉ. दिपीका पाटील, डॉ. दिपीका व्यवहारे, डॉ. निकीता अढाव, व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेचे सुत्रसंचलन रोहीणी कुडनरकर, आदिती आमझरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. भागवत वसे यांनी केले.