यशासाठी हवे संकल्पाचे सामर्थ्य

21 Aug 2025 09:12:33
नागपूर, 
shabari-kavach समूहाची शक्ती सर्वज्ञात आहे आणि जीवनात यश मिळविण्यासाठी संकल्पाचे सामर्थ्य आवश्यक असते. विशेषत: सकारात्मक ऊर्जेसह सामूहीक संकल्प केल्यास निश्चितच भौतिक जीवनात यश मिळते. या विचारांतून श्री शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळ्याचे आयोजन नागपुरात करण्यात आले. भगवती नक्षर परिसरातील श्री भगवती मंदीरात आयोजित या कार्यक्रमाला शेकडो नाथभक्तांची उपस्थिती होती.
 
 
shabari-kavach
 
महाराष्ट्रात नाथ संप्रदायाची उपासना शतकानुशतके सुरू आहे. भाविकांसाठी श्री नवनाथ भक्तिसार ही ग्रंथदेवता आहेच आणि त्यासोबतच विविध देवतांच्या बीजमंत्रांनी सिद्ध शाबरी कवचाचे पठणही घरोघरी केले जाते. शाबरी कवचाचे पठण सामूहीक आणि व्यापक स्तरावर घेण्यास नागपूरच्या श्री मुकुंद दादा अंधारे नवनाथ शक्तिपीठ ट्रस्टने सुरुवात केली. यंदा या उपक्रमाचे दहावे वर्ष होते. या सोहळ्यात 11 भाविकांनी 11 वेळा शाबरी कवचाचे सामूहीक वाचन केले. shabari-kavach तर, विविध ठिकाणी राहणाऱ्या 50 पेक्षा जास्त भाविकांनी आपापल्या घरी कवच पठण करून, सहस्त्रावर्तनात आपले योगदान दिले.
 
महिलांसाठी नाथसंप्रदायाची उपासना प्रतिबंधित मानली जात होती. पण, नाथ संप्रदायाचे अभ्यासक आणि मार्गदर्शन मुकुंद दादा अंधारे यांच्या प्रयत्नांतून शेकडो महिलांनी नाथ संप्रदायातील भक्तीमार्गाचा स्वीकार केला आहे. shabari-kavach शिवाय, सर्वधर्म समभावाने सर्व समाजबांधवांनी या उपक्रमात सहभाग घेतला. महाआरती आणि प्रसादाने समारोप झालेल्या या कार्यक्रमाला मुकुंद दादा अंधारे, नवनाथ शक्तीपीठ ट्रस्टच्या अध्यक्ष सुवर्णा अंधारे, मंदीर समितीचे सचिव संदीप चौधरी आणि कोषाध्यक्ष मंगेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. तरुण भारतच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित तुळस लावा, पर्यावरण वाचवा या उपक्रमांतर्गत तुळशीचे रोप मंदीराच्या प्रांगणात लावण्यात आले.
Powered By Sangraha 9.0