अकोला,
drowned in the river : अकोला-मुर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खोळद गावाजवळ पोळा सणानिमित्त बैलांना चारण्यासाठी व अंघोळीसाठी घेऊन गेलेला युवक शंतनू अविनाश मानकर (२३) हा पिढी नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली असून आपत्ती शोध बचाव पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.
अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे खोळद गावात हळहळ व्यक्त होत असून मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शंतनू हा अविनाश मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता व गावात आर.ओ चा प्लॅन्ट टाकून तो व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होता.दरम्यान तहसीलदार मुर्तीजापुर शिल्पा बोबडे, यांच्या सूचनेवरून शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बोटीच्या सहाय्याने वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेणे सुरू आहे.पथकात सुनील कल्ले, वंदे मातरम शोध व बचाव पथक कुरणखेड, वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक शोधकार्य करीत आहेत.