चंद्रपूर,
illegally carrying sword : अवैधरित्या तलवार बाळगणार्या युवकास भद्रावती पोलिसांनी गुरूवारी अटक केली. अमीत ओमप्रकाश टेंभुर्णे (25, रा. नगर पंचशिल वॉर्ड, भद्रावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
भद्रावती यैथील राहुल नगर पंचशिल वॉर्ड येथे एक युवक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अवैधरित्या तलवार बाळगून असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी आरोपी अमीत टेंभुर्णे याच्या घरी धाड टाकून त्यास ताब्यात घेतले. आरोपीकडून चमकदार पाते असलेली 83 सेमी लांबीची धारदार लोखंडी तलवार जप्त करून भद्रावती पोलिस ठाण्यात कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहे. ही कारवाई भद्रावती पोलिस ठाणचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक गजानन तुपकर, सहायक फौजदार महेंद्र बेसरकर, हवालदार अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, गोपाल आतकुलवार, खुशाल कावळे आदींनी केली. .