शेतकर्‍यांनी साजरा केला अभीनव ट्रॅक्टर पोळा

*केंद्रीयमंत्री जाधव झाले ट्रॅटर पोळ्यात सहभागी

    दिनांक :22-Aug-2025
Total Views |
बुलडाणा, 
prataprao-jadhav : राज्यात सर्वत्र बळीराजाचा सर्वात महत्त्वाचा सण बैलपोळा साजरा होत आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणत शेती उपयोगी कामे केली जातात आजच्या शेतीमध्ये बैलांची आणि ट्रॅक्टर यांची उपयोगिता सारखीच असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं या ट्रॅक्टर पोळ्या मध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ट्रॅक्टर चालवत या पोळ्यात सहभागी झाले होते.
 
 

jlk 
 
 
 
शेतकर्‍यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणार्‍या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकर्‍याकडील बैल जोड्यांची संख्या कमी झाली आहे शेतीच्या कामगिरी आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो किंबहुना त्या माध्यमातून शेतीची कामे केले जातात त्यामुळे पोळ्या सारखे सण उत्सव हे पुढेही कायम राहावे या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी बांधवांच्या वतीने एक आगळा वेगळा पोळा साजरा करत एक आभीनव मिरवणूक मेहकर शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली. या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये जवळपास १५० ते २०० ट्रॅक्टर सहभागी झाले होते.
 
 
जे वर्षभर आपल्या बळीराजा करिता शेतात सर्जा राजाच्या बरोबरीने आजच्या आधुनिक युगात योगदान देत असतात असे ट्रॅक्टर देखील आज आपल्याला शहरातील रस्त्यावर दिसुन आले. या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव माजी आमदार संजय रायमुलकर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळुकर शहर प्रमुख जयचंद भाटिया यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्याच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.