‘त्या’ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना अखेर पदोन्नती

-गोंदियातील ४, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरातील प्रत्येकी २ पोलिस अधिकार्‍यांचा समावेश -लवादाच्या आदेशाच्या अधिन निर्णय

    दिनांक :22-Aug-2025
Total Views |
गोंदिया, 
promotion-assistant-police-inspector : न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीच्या मार्गातील अडथळा मार्गी लागला आहे. गोंदिया पोलिस दलातील चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरातील प्रत्येकी २ अशा राज्यातील तब्बल ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. यासंदर्भातील आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने २१ ऑगस्ट रोजी जारी केले आहे.
 
 
jlkj
 
गेल्या महिन्यात या सहायक पोलिस निरीक्षकांना दिल्या जात असलेल्या पदोन्नतीला १०७ क्रमांकाच्या तुकडीच्या काही अधिकार्‍यांनी प्रशासकीय लवादा समोर आवाहन दिल्याने त्यांची पदोन्नती रखडली होती. महिनाभरापासून आदेश अडकून होते. दोन दिवसांपूर्वी लवादाच्या दिल्या जाणार्‍या आदेशाला अधीन राहून पदोन्नतीचे आदेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता यांनतर २१ ऑगस्ट रोजी पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील तब्बल ३६४ सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नती व नव्या नियुक्तीचे आदेश जारी केले. गोदितील ईश्वर हनवते, संजय नाईक यांना नागपूर ग्रामीण, अतुल तवाडे यांना नागपूर शहर तर नितीन वडते यांना पोलिस प्रशिक्षण विद्यालय नागपूर येथे पदोन्नती मिळाली आहे. भंडारातील सतीष बनसोडे यांना भंडार्यातच तर विनोद गिरी यांना वर्धा येथे बढती मिळाली आहे. गडचिरोलीतील प्रमोद बघेले यांना नागपूर शहर, गणेश फुलवकर यांना नागपूर ग्रामीण आणि चंद्रपूरातील सुधाकर कोकोडेंना चंद्रपूर व देवाजी नरोट यांना नागपूर शहरात पदोन्नती देण्यात आली आहे. उशिरा का होईना पदोन्नतीचे आदेश निर्गमित झाल्याने पोलिस दलात उत्साहाचे वातावरण आहे.
 
राज्यातील पोलिस दलातील जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत रिक्त झालेल्या पदांवर भरतीचा निर्णयही २० ऑगस्ट रोजी शासनाने घेतला आहे. यात पोलिस शिपाई १२३९९, पोलिस शिपाई चालक २३४, बॅण्डस्मन २५, सशस्त्र पोलिस शिपाई २३९३ आणि कारागृह शिपाई ५८० अशी १५६३१ पदे लवकरच भरली जाणार आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात पोलिस दलातील कर्मचारी व अधिकार्‍यांना मोठ्या प्रमाणांत पदोन्नती मिळणार असल्याने संपूर्ण पोलिस दलात आज तरी आनंदाचे वातावरण आहे.