हिंगणघाटच्या तान्हा पोळ्यात १२५ तुळस रोपांचे वाटप

26 Aug 2025 20:53:17
हिंगणघाट,
hinganghat-tanha-pola : तरुण भारतच्या उपक्रमाला प्रतिसाद देत संत ज्ञानेश्वर वार्ड येथील साईकृपा सोसायटीमध्ये आयोजित तान्हा पोळ्यात नंदी बैल घेऊन आलेल्या छोट्या मुलांना १२५ तुळस रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामगीतेचे अभ्यासक दादाजी कुबडे यांनी तुळशीचे धार्मिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्व विषद केले.
 
 
 
jk
 
 
 
तरुण भारतचा शताब्दी महोत्सव आणि श्री नरकेसरी प्रकाशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाभर तुळसदान अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील साईकृपा सोसायटीमध्ये शनिवारी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, चिमुकल्यांना १२५ तुळस रोपांचे वाटप करण्यात आले.
 
 
कार्यक्रमाला दादाजी कुबडे, दिलीप वाघमारे, अरविंद गौळकर, विनोद महाजन, एकनाथ दडमल, पवन काशिपुत्र, लोकेश निशाणे, अक्षय निशाणे, साहिल चिंचुलकर, संकेत कावळे, लोकेश मांडवकर, बालू चावरे, रितेश डडमल, संकेत सातपुते, गणेश मांडवकर, दर्शन धानोरकर, गौरव डडमल, आशिष कुबडे, अमोल वाघमारे, अमोल रामगुंडे, किशोर देवढे, गणेश चकोले, पवन वाघमारे, धनंजय मोहरले, किरण मडावी व नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0