सामका आयुर्वेद सेंटरमध्ये ‘तुळशीचे हरितवन’

रुग्णांसाठी शुद्ध प्राणवायू व आरोग्याचे वरदान

    दिनांक :26-Aug-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Samaka Ayurveda Center : सामका आयुर्वेद योग व वेलनेस सेंटर येथे कृष्णतुळस व कर्पूरतुळस यांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून हा परिसर रुग्णांसाठी शुद्ध प्राणवायूचे वरदान ठरत आहे. तुळशी अर्क व काढाप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या केंद्रामध्ये येणाèया प्रत्येक रुग्णाला तुळशी अर्क व तुळशीचा काढा दिला जातो. अस्थमा, श्वसनाचे विकार व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे उपाय विशेष उपयुक्त ठरत आहेत.

y26Aug-Samaka 
 
मॉर्निंग वॉक ट्रॅकवर हिरवळ व प्राणवायू
 
 
सेंटरच्या मॉर्निंग वॉक ट्रॅक परिसरात सर्वत्र तुळशीची लागवड असल्याने फिरायला, योगासने व प्राणायामासाठी येणाèया प्रत्येकाला शुद्ध ऑक्सिजनचा लाभ मिळतो. त्यामुळे वातावरण निरोगी, शांत व ऊर्जा देणारे झाले आहे.
‘तरुण भारत’च्या मोहिमेतून प्रेरणा
 
 
संस्थेचे अध्यक्ष वैद्य पंकज पवार म्हणाले, ‘तरुण भारत’ने आरोग्य व हरित मोहिमेसाठी उचललेले पाऊल आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले. त्याच आदर्शातून सामका आयुर्वेदमध्ये तुळशीची लागवड करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना औषधी वायू, निरोगी वातावरण आणि योगाभ्यासाचा त्रिगुणी लाभ मिळतो.