सिंदी (रेल्वे),
tanha-pola-tulsi-plants : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण गतिविधीअंतर्गत शनिवारी येथील नंदी पोळ्यात बालकांना तुळशीची १०० पेक्षा जास्त रोपटी वाटण्यात आली.
मानवाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करणार्या तुळशीचे औषधी गुण अद्यापही आमजनतेस कळले नाही. तुळशी प्रत्येक घरी दर्शनी भागात असल्यास मानवाचे रक्षण नकळत होते. शनिवारी जुन्या पोलिस ठाण्याच्या प्रांगणात जमलेल्या बालगोपालांना संघाच्या हिंदी प्रांताचे कार्यवाह अंकित ढोबळे यांच्या पुढाकाराने १०० रोपट्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ३६०० बालक-बालिका आपल्या काष्ठ कलाकृतींसह विविध वेशभूषेत उपस्थित होते. विवेक मांडवकर, पर्यावरण रक्षा समिती प्रमुख अनिल साटोणे, शहरातील स्वयंसेवक आणि संघप्रेमी नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश बाल गोपालांना देण्यात आला.