दलीप ट्रॉफीत दानिश मालेवारचा ऐतिहासिक द्विशतक

29 Aug 2025 15:36:54
नवी दिल्ली,
Danish Malewar दलीप ट्रॉफीत विदर्भचा तरुण फलंदाज दानिश मालेवारने विक्रमी कामगिरी करून दाखवली आहे. सेंट्रल झोनकडून खेळणाऱ्या या उजव्या हाताच्या टॉप ऑर्डर फलंदाजाने नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध जबरदस्त खेळी साकारली. अवघ्या 21 वर्षांच्या दानिशने आपल्या डावात 36 चौकार आणि एक षटकार ठोकत 203 धावांची भव्य खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे सेंट्रल झोनने पहिल्या डावात 532 धावा उभारल्या. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारने डाव घोषित केला.
 

Danish Malewar 
दानिशच्या या द्विशतकामुळे तो विदर्भ क्रिकेट इतिहासात अमर झाला आहे. दानिश हा विदर्भचा पहिला खेळाडू ठरला आहे ज्याने दलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक ठोकले आहे. आतापर्यंत दलीप ट्रॉफीत द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये यशस्वी जायसवाल, बाबा अपराजित, बाबा इंद्रजीत यांची नावे होती, त्यात आता दानिश मालेवारचाही समावेश झाला आहे.दानिशने गेल्या वर्षी रणजी ट्रॉफीत प्रथमच खेळण्यास सुरुवात केली होती. पदार्पणाच्या हंगामातच त्याने 9 सामन्यांत 2 शतकं आणि 6 अर्धशतकांच्या जोरावर तब्बल 783 धावा केल्या. त्याची फलंदाजीची सरासरी 50 च्या घरात आहे. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही त्याने शतक ठोकत आपले कौशल्य सिद्ध केले होते.
 
 
याशिवाय विदर्भ Danish Malewar प्रो लीगमध्येही दानिशने आक्रमक खेळ करताना 6 सामन्यांत 160 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 318 धावा केल्या होत्या. या मालिकेत तो इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता.दानिश मालेवारचा हा प्रवास पाहता तज्ज्ञ त्याला भारतीय क्रिकेटसाठी भविष्यातील दीर्घ पल्ल्याचा घोडा मानत आहेत. पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक झळकावून त्याने विदर्भ क्रिकेटचा मान उंचावला असून आता संपूर्ण देशाचे लक्ष या तरुण खेळाडूकडे लागले आहे.
Powered By Sangraha 9.0