चाकूच्या धाकावर 2 विद्यार्थिनीचे अपहरण

03 Aug 2025 21:28:20
न्यू आर्टस् कॉलेज परिसरातील घटना
 
वर्धा,
kidnapped at knifepoint दोन तरुणांनी दुचाकीने येत चाकूच्या धाकावर 2 विद्यार्थिनीचे अपहरण केले. ही खळबळजनक घटना २ रोजी सकाळी ९. ३० वाजताच्या सुमारास शहरातील न्यू आर्टस् कॉलेजच्या परिसरात घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेत रामनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे ब-याच वेळानंतर या दोन्ही पीडिता कशाबशा घरी पोहोचल्याचे वृत्त आहे.
 
 
kidnapped at knifepoint
 
रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दोन्ही विद्यार्थिनी १५ वर्ष वयोगटातील असून त्या शहरातीलच एका शाळेत दहावीत धडे घेत आहेत. यापैकी एका मुलीचा रेहान नावाच्या तरुणाकडून आठ दिवसांपासून छळ होत होता. तो तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचाही प्रयत्न करत होता. त्याने मुलीला धमकी देत तिचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर तो तिला फोन व मॅसेज पाठवू लागला. kidnapped at knifepoint पीडितेने त्याला प्रतिसाद दिला नाही. अशातच २ रोजी सकाळी पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत शाळेत जात असताना रेहान व त्याच्या मित्र ओम याने न्यू आर्ट्स कॉलेजच्या परिसरातून चाकूच्या धाकावर दोन्ही अल्पवयीन मुलींचे अपहरण केले.
 
 
आरोपींनी दोन्ही मुलींना सालोड मार्गावरील आनंदनगरी गार्डनमध्ये नेले. जिथे आरोपींनी पीडितांशी असभ्य वर्तन केले. मुलींनी प्रतिकार केला आणि मदतीसाठी ओरड केली. kidnapped at knifepoint त्यानंतर आरोपी तरुणांनी दोन्ही मुलींना शहरात परत आणून पोबारा केला. घरी पोहोचल्यानंतर पीडितांनी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. रात्री उशिरा दोन्ही पीडित मुली आणि त्यांचे पालक रामनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनीही तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत तपासाला सुरूवात केली आहे. अपहरणकर्त्यांचा शोध पोलिस घेत आहे.
Powered By Sangraha 9.0