खाकी वर्दीनेच वाचवला वर्दीधाऱ्यांचा संसार

03 Aug 2025 12:50:07
अनिल कांबळे
नागपूर,
Bharosa Cell Nagpur intervention विवाहित पाेलिस हवालदाराची आपल्या सहकारी महिला कर्मचाऱ्याशी मैत्री झाली. त्यातून त्यांच्यात जवळीकता वाढली. दरम्यान, त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाबाबत हवालदाराच्या पत्नीला कुणकुण लागली. त्यावरुन घरातील वाद थेट संसार तुटण्यापर्यंत पाेहचला. शेवटी भराेसा सेलने तक्रारीनंतर हस्तक्षेप करीत पती-पत्नीसह महिला पाेलिस कर्मचाऱ्याचेही समूपदेशन केले. तिघांनीही सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे खाकी वर्दीनेच वर्दीधारकांचा संसार वाचवला.
 

Bharosa Cell Nagpur intervention 
नागपुरातील गिट्टीखदानमध्ये राहणारी उच्चशिक्षित तरुणी स्वाती (काल्पनिक नाव) हिचे नाशिक जिल्ह्यातील एका खेडेगावात राहणारा हाेतकरु युवक संजय (काल्पनिक नाव) याच्याशी 10 वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर दुसèयाच वर्षी ताे नाशिक जिल्हा पाेलिस दलात नाेकरीला लागला. त्याने पत्नीला आईवडिलांकडे ठेवून नाशिक शहरात ताे रुजू झाला. संजय आणि स्वातीचा संसार सुरळीत सुरु हाेता. त्यांना एक मुलगा व मुलगी झाली. पूर्वी शिक्षिका म्हणून नाेकरी करणारी स्वाती लग्नानंतर नाेकरी करण्याची इच्छा असूनही सासरी राहून मुलांचा सांभाळ करीत हाेती. तर संजय हा खेडेगावातून जिल्ह्यातील एका पाेलिस ठाण्यात ड्युटी करीत हाेता. यादरम्यान, संजयची ओळख पाेलिस ठाण्यात कार्यरत राणी (काल्पनिक नाव) हिच्याशी झाली. राणीला 8 वर्षांची मुलगी असून ती घटस्ाेटीत आहे. दाेघांची मैत्री जमली. दाेघेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे वाढले. राणीला संजयने घरी आणले आणि पत्नीशीही ओळख करुन दिली. पतीची सहकारी म्हणून स्वातीने काेणताही आक्षेप घेतला नाही. मात्र, काही दिवसांपासून संजयच्या स्वभावात बदल झाला. ताे जिल्ह्याच्या ठिकाणी भाड्याने खाेली घेऊन राहायला लागला. घराकडे त्याचे दुर्लक्ष हाेत असल्याचे स्वातीच्या लक्षात आले.
 
 
मैत्रिणीच्या घरात आढळला पती
 
 
स्वातीला संशय आल्यानंतर ती अचानक पाेलिस ठाण्यात पाेहचली. त्यावेळी राणी आणि संजय दुचाकीने घरी गेल्याचे सांगण्यात आले. ती मुलांसह राणीच्या घरी गेली. त्यावेळी संजय तेथे विश्रांती घेताना आढळून आला. तसेच राणीने घेतलेल्या भूखंडावर दाेघांनी मिळून दाेन माळ्यांचे घरसुद्धा बांधल्याचे लक्षात आले. दाेघांच्या संबंधावर स्वातीने आक्षेप घेत राणीशी जाेरदार भांडण केले.
 
 

पती-पत्नीत मैत्रिणीवरुन वाद
 
 
राणीसाेबत असलेल्या संबंधावरुन पती-पत्नीत वाद सुरु झाले. वाद विकाेपाला गेले आणि स्वाती दाेन्ही मुलांना घेऊन नागपुरात माहेरी आली. त्यानंतर संजयनेही पत्नी व मुलांकडे दुर्लक्ष केले. आईवडिलांकडे राहणाèया स्वातीला मुला-मुलींच्या शिक्षण आणि त्यांच्या उदरनिर्वाहाची चिंता वाटली. परंतु, संजयने तिला आर्थिक मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे स्वाती अडचणीत आली. त्यामुळे तिने भराेसा सेलमध्ये धाव घेऊन तक्रार दिली.
 
 

भराेसा सेलने साेडवला तिढा
 
 
स्वातीच्या तक्रारीवरुन पाेलिस हवालदार संजयला भराेसा सेलमध्ये बाेलविण्यात आले. मात्र, ताे पाेलिस असल्याचे सांगून येण्यास टाळाटाळ करीत हाेता. वरिष्ठ अधिकाèयांच्या हस्तक्षेपानंतर ताे नागपुरात उपस्थित झाला. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी पती-पत्नीला समाेरासमाेर बसवून वाद समजून घेतला. जयमाला डाेंगरे यांनी त्यांचे समूपदेशन केले.त्यानंतर पाेलिस कर्मचारी राणीची बाजू ऐकून घेण्यात आली. तिघांनीही सामंजस्याने घेण्यावर भर दिला. राणीने स्वतःची बदली करुन घेतली तर संजय चूक मान्य करुन ड्युटीच्या ठिकाणी नाशिकला पत्नी व मुलांसह राहायला गेला. अशाप्रकारे भराेसा सेलने तिढा अलगद साेडवला.
_सीमा सुर्वे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
भरोसा सेल, गुन्हे शाखा.
Powered By Sangraha 9.0