अत्याचारप्रकरणी सहआरोपीला २० वर्षाचा कारावास

03 Aug 2025 21:44:35
गोंदिया,
Gondia District Court अपंग विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या मुख्य आरोपीसह त्याला याकामी मदत करणार्‍या सहआरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांनी २ ऑगस्ट रोजी २० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवली. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना यातील मुख्य आरोपी भोजराज टेंभूर्णे याचा मृत्यू झाला आहे. तर देवा उर्फ देवीदास इस्कापे असे सहआरोपीचे नाव आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाववबांध पोलिस हद्दीतील ३९ वर्षीय विधवा व जन्मजात मुकी असलेल्या महिलेच्या घरात १४ सप्टेंबर २०१८ आरोपी भोजराज टेंभुर्णे व देवा उर्फ देवीदास इस्कापे हे आत शिरले व पीडित महिलेच्या लहान मुलाला मारहाण करून घरात बाहेर काढले. दरम्यान भोजराज टेंभुर्णे हा पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.
 
 
Gondia District Court
 
हे भोजराज हे घृणित कृत्य करत असताना देवा इस्कापे याने तिचे हातपाय पकडून ठेवले होते. दरम्यान, या प्रकाराची माहिती पीडितेने मोठा मुलगा व तिचा पुतन्याला दिली. त्यांनी १५ जुलै रोजी नवेगावबांध पोलिस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर भादंवि ३७६, (२) (एल), ३७६ (ड), ३२३ कलमान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी प्रथम तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह शेळके व त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल उजवणे यांनी तपासाअंती आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. Gondia District Court प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना यातील मुख्य आरोपी भोजराज टेंभूर्णे याचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणात सहआरोपी देवा इस्कापे याने लैंगिक अत्याचार केला नसला तरी दोन्ही आरोपींचा सामायिक प्रयत्न पीडीतावर अत्याचार करण्याचा असल्याचे सिद्ध होत असल्याने सहआरोपी देवा इस्कापे याचे कृत्य हे भादंवि ३७६ (ड) अन्वये गुन्हा ठरतो. मुख्य आरोपीचा मृत्यू झाला असला तरी सहआरोपीस त्याने केलेल्या अपराधासाठी दोषी धरता येते, असे महत्वपूर्ण निरीक्षण न्या. जोशी यांनी नोंदवून आरोपीला २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाचा हा निर्णय समाजात एक उदाहरण निर्माण करणारा ठरला.
Powered By Sangraha 9.0