नागपूर,
record-of-making-shivling : माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनात मानकापूरच्या शिव मंदिर परिसरात श्रावण महोत्सवाअंतर्गत रविवारी ६,२६,८९६ मातीचे शिवलिंग भाविकांनी तयार केले.
समाजाच्या विविध संस्थांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे रविवारी सर्वाधिक शिवलिंग तयार करता आले. यात प्रामुख्याने खापरखेडा येथून आलेल्या शुभांगी वाघ यांनी १० हजार ५१ शिवलिंग तयार केले. सकाळची पूजा अजय कुमार त्रिपाठी यांच्या हस्ते झाली. तर संध्याकाळी अभिषेक आरती शुभांगी वाघ, अंजली पाली, रेखा कश्यप यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी विश्वकर्मा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय काचीपुरा महिला मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजेश सोनू मिश्रा आणि त्यांच्या चमूने दिवसभर मातीचे शिवलिंग तयार केले. भारतीय जनता विद्यार्थी मोर्चाचे ५० हून अधिक कार्यकर्ते शिव भोले बाबांचे आभार मानत हजारोंच्या संख्येने शिवलिंग तयार केले. येत्या २४ ऑगस्टपर्यंत भाविकांना शिवलिंग तयार करता येणार आहे.