संताच्या नगरीत शिवभक्तांची ‘मांदियाळी’

03 Aug 2025 21:56:03
गोंदिया,
Shravan Monday Special शुद्ध श्रावण मासाला सुरुवात होताच जिल्ह्यातील शिवालयात ‘हर हर महादेव’चा गजर होत आहे. तालुक्यातील कामठा येथील लहरीबाबा आश्रमातील शिवमंदिरातही भोलेनाथाचा जयकार होत आहे. मध्यकाशी म्हणून ओळख असलेल्या व शिवलिंगीप्रमाणे निर्मित या शिव मंदिरात गोंदियासह राज्यातील अनेक जिल्हे व शेजारील मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील भाविक हजेरी लावत असून सोमवारी दुसर्‍या श्रावण सोमवारच्या निमित्ताने हजारो भाविक भगवान भोलेनाथ व संत लहरीबाबा यांच्या दर्शनासाठी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या मंदिरात भाविकांची मांदियाळी राहणार आहे.
 
 
Shravan Monday Special
 
कामठा हे गाव महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात असून येथे संत लहरीबाबा यांचे आश्रम आहे. या आश्रम परिसरातच लहरीबाबांच्या असतानाच येथे विशाल शिवलिंग आकारातील शिवमंदिर उभारले आहे. या मंदिराची उंची ८५ फूट असून ७५ फूट चौरस जागेत या मंदिराचे बांधकाम केले आहे. विशेष म्हणजे, या मंदिरात दर महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. Shravan Monday Special तर श्रावण मासात मंदराचे पिठाधीश संत डॉ. खिलेश्वरनाथ यांच्या मार्गदर्शनात मासिक सत्संगाचे आयोजन करण्यात येते. तेव्हा संपूर्ण श्रावण महिन्यात येथे भक्तांचा मेळा पहावयास मिळते. विशेष म्हणजे, या श्रावण मास सत्संगात जिल्ह्यातील भाविकांसह राज्यातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, नाशिक, पुणे या जिल्ह्यातील व मध्यप्रदेशातील बालाघाट, सिवनी, जबलपूर व छत्तीसगड राज्यातील रायपूर, बिलासपूर, खैरागड आदी ठिकाणाहून भाविक सत्संगात सहभागी होतात.
Powered By Sangraha 9.0