नागरिक व श्वानाच्या सतर्कते मुळे चोरटे फरार

03 Aug 2025 21:37:00
हिंगणघाट
Thieves escape due to alertness येथील जुन्या वस्तीतील लाला लाजपतरॉय शाळे जवळ राहणारे प्रशांत लगड यांच्या घराच्या आवारात आज रविवार, दि 3 आगस्टला रात्री 2 ते अडीचच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती पैकी दोन व्यक्तींनी सुरक्षा भिती वरून आत उड्या घेतल्यापरंतु परिसरातील कुत्र्यांनी मध्यरात्री हें तीन अनोळखी व्यक्ती पाहून जोरदार भुंकण्यास सुरुवात केली.
 

Thieves escape due to alertness 
 
या कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजामुळे परिसरातील शिवाजी कारवटकर हें उठले व बाहेर येवून त्यांनी लगड यांच्या घराच्या दिशेने बघितले असता दोन युवक लगड यांच्या घराच्या आवारात संशयास्पद अवस्थेत दिसून आले. कारवटकर यांना पाहून ते दोघेही फाटका वरून उड्या मारून फरार झाले. Thieves escape due to alertness तिसरा युवक बाजूच्या भिंतीला खेटून उभा असल्याचे पाहून सदर व्यक्तीने तू काय करीत आहे असे विचारले असता त्या व्यक्तीने उलट दरडाउन तुम क्या कर रहे हो? असे हिंदीतून असे विचारले. आणि बाचा बाची करून सदर तिसराही व्यक्ती पळाला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0