अनियंत्रित काळीपिवळीची दुचाकीला धडक

30 Aug 2025 19:27:22
मुरदोली जंगल शिवारातील घटना
गोंदिया,
Accident News अनियंत्रित काळीपिवळीने दुचाकीला धडक देत रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून उलटली. यात काळीपिवळीतील १० प्रवाशांसह दुचाकीचालक जखमी झाले. ही घटना आज, ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल शिवारात घडली.
 
 
Accident News
 
गोंदिया येथून एमएच ४०/९०१० क्रमांकाच्या काळापिवळी टॅक्सी चालक अमिन रहमान शेख रा. फुलचूर हा प्रवासी घेऊन कोहमाकडून गोंदियाकडे येत होता, Accident News  तर एमएच ३३ एस २७७३ क्रमांकाचा दुचाकीचालक हा गोंदियाकडून कोहमाराकडे जात होता. दरम्यान मुरदोली जंगल शिवारात काळीपिवळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व काळीपिवळी दुचाकीला धडक देत रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडाला धडकून रस्त्याखाली उलटली.
 
 
यात काळीपिवळीतील १० प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी दुचाकीचालकाला उपचारासाठी गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत दुचाकीस्वाराचे नाव कळू शकले नाही. Accident News किरकोळ जखमींवर गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. काळीपिवळीचालक मद्य प्राशन करून वाहन चालवत असल्याचे प्रवासी सांगताहेत. याप्रकरणी गोरेगाव पोलिसानी घटनेची नोंद केली आहे.
Powered By Sangraha 9.0