प्रत्येक शाळेत १४ ऑगस्टला हाेणार पसायदान पठण

04 Aug 2025 21:21:15
नागपूर,
Pasayadan recitation विश्वाच्या निरंतर कल्याणासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ईश्वराजवळ पयासदान मागितले. मराठी साहित्यातील हा एक ठेवा अमूल्य ठेवा आहे. सन 2025 हे माऊलींच्या 750 व्या जयंतीचे वर्ष आहे. यानिमित्ताने माऊलींनी पसायदानातून दिलेला विचार राज्यातील प्रत्येक शाळेत एकाच वेळी पाेहचावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार येत्या 14 ऑगस्ट राेजी राज्यातील प्रत्येक शाळेत पसायदानाचे पठण करण्यात यावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना दिले आहेत.
 
 
Pasayadan recitation
 
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी पुणे येथील शिक्षण विभागाच आयुक्तांना यासंदर्भात कळविले आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून हे आदेश राज्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित, खासगी, महापालिका, जिल्हा परिषद, संस्थात्मक शाळांना कळविण्यात आले आहेत. Pasayadan recitation 15 ऑगस्ट राेजी गाेकुळ अष्टमीला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची 750 वी जयंती आहे. या दिवशी स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन, प्रभातेरीचे कार्यक्रम शाळांमध्ये असल्याने पसायदान पठणाचा कार्यक्रम 14 ऑगस्ट राेजी करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश आहेत.
 
 
प्रत्येक शहरात पालखी मिरवणूक
प्रत्येक शहरात ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकाेत्तर सुवर्णमहाेत्सवी जयंतीवर्षा निमित्त येत्या 15 ऑगस्ट राेजी राज्यातील प्रत्येक नगर व शहरांमध्ये महानगरपालिका, Pasayadan recitation नगरपालिका, नगरपरिषद यांनी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत माऊलींची प्रतिमा, मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून हा उत्सव साजरा करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
Powered By Sangraha 9.0