मुंबई,
Dhadak 2 सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘धडक 2’ या बहुचर्चित चित्रपटाकडून प्रेक्षकांना आणि निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, रिलीजनंतर या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. कथा आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक झाले असले तरी, बॉक्स ऑफिसवर मात्र चित्रपटाची कामगिरी निराशाजनक ठरली आहे.चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 3.5 कोटींची सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी 3.75 कोटी, तिसऱ्या दिवशी 4.15 कोटी, तर चौथ्या दिवशी केवळ 1.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.पाचव्या दिवशी (मंगळवार) ‘सॅकनिल्क’च्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार चित्रपटाने केवळ 1.60 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे पाच दिवसांतील एकूण कमाई 14.35 कोटी रुपये इतकी झाली आहे.
प्रबळ स्पर्धेमुळे ‘धडक 2’ला फटका
सध्या प्रेक्षकांच्या Dhadak 2 पसंतीस आलेल्या ‘सैयारा’, ‘सन ऑफ सरदार 2’ आणि ‘महावतार नरसिंह’ या चित्रपटांमुळे ‘धडक 2’ला पुरेशी स्क्रीन्स आणि प्रेक्षक मिळू शकले नाहीत. विशेषतः ‘सैयारा’मधील अहान पांडे आणि अनीत पड्डा यांची केमिस्ट्री तरुण प्रेक्षकांना भावत असल्याने ‘धडक 2’च्या लीड जोडीची चमक कमी पडली.‘धडक 2’चा एकूण अंदाजित बजेट 45 कोटी रुपये इतका आहे, ज्यामध्ये 35 कोटी रुपये निर्मिती खर्च, तर 10 कोटी रुपये प्रमोशन आणि मार्केटिंगसाठी खर्च करण्यात आले आहेत. परंतु पाच दिवसांत केवळ 14.35 कोटींची कमाई झाल्याने, चित्रपटाला आपला खर्च वसूल करणं कठीण होणार आहे.
कथानक आणि निर्मिती
‘धडक 2’ ही 2018 मध्ये आलेल्या ‘धडक’ची स्प्रिच्युअल सिक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाझिया इक्बाल यांनी केले असून, करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शन्सने निर्मिती केली आहे.चित्रपटाची कथा आंतरजातीय प्रेम आणि सामाजिक भेदभाव या गंभीर विषयांवर आधारित आहे