मुंबई,
Sanjay Kapoor death प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर यांचे 12 जून 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. सुरुवातीला असे सांगितले जात होते की लंडनमध्ये पोलो खेळताना त्यांचा मृत्यू झाला. मात्र आता ब्रिटनमधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूबाबतचा अधिकृत अहवाल प्रसिद्ध केला असून, तो मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे सांगण्यात आले आहे.
संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्या कार्यालयाकडून ब्रिटिश अधिकाऱ्यांचा हा अहवाल प्रसारित करण्यात आला. ही माहिती अशा वेळी समोर आली आहे जेव्हा संजय कपूर यांच्या आई रानी कपूर यांनी ब्रिटनमधील अधिकाऱ्यांकडे आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत संपूर्ण तपास करण्याची मागणी केली होती.
रानी कपूर, Sanjay Kapoor death या सोना समूहाच्या माजी अध्यक्षा, यांनी 24 जुलै रोजी कंपनीच्या शासी मंडळाला पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या म्हणाल्या की संजयच्या मृत्यूमुळे कुटुंब शोकात असताना काही व्यक्तींनी याच काळात कंपनीवरील नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि पारंपरिक संपत्तीवर ताबा मिळवण्याचे षड्यंत्र रचले. त्यांच्या मते, संजय कपूर यांचा मृत्यू "अत्यंत संशयास्पद परिस्थितीत" झाला आहे.संजय कपूर यांच्या पश्चात त्यांच्या अंदाजे 30 हजार कोटी रुपयांच्या इस्टेटबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. यामध्ये करिश्मा कपूर यांच्या सहभागाबाबतही चर्चांना ऊत मिळाला होता. परंतु नंतर हे स्पष्ट झाले की करिश्मा या वादात सहभागी नाहीत आणि त्या केवळ आपल्या मुलांच्या भविष्याबाबत विचार करत आहेत. त्या अलीकडेच मुलांना घेऊन दिल्लीला गेल्या होत्या.
दरम्यान, Sanjay Kapoor death संजय कपूर यांच्या निधनानंतर कंपनीच्या शासी मंडळाने 23 जून 2025 रोजी जेफरी मार्क ओव्हरली यांची नव्याने अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.संजय कपूर यांच्या मृत्यूबाबत अद्यापही अनेक शंका आणि तर्कवितर्क सुरू आहेत. अधिकृत अहवाल जरी मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाल्याचे सांगत असला, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे ही बाब अधिक सखोल चौकशीची मागणी करते.