कोरियन अभिनेते सॉन्ग यंग-क्यू यांचा मृत्यू

06 Aug 2025 12:52:44
कोरिया
Song Young Kyu death दक्षिण कोरियाचे प्रसिद्ध अभिनेते सॉन्ग यंग-क्यू यांचं अचानक निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. 3 ऑगस्ट रोजी, त्यांना ग्योंगगी प्रांतातील योंगिन शहरातील टाउनहाउस परिसरात त्यांच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळून आलं. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
 

Song Young Kyu death 
सॉन्ग यंग-क्यू हे 55 वर्षांचे होते आणि त्यांनी ‘बिग बेट’, ‘ह्वारांग’, ‘हॉट स्टोव लीग’ यांसारख्या लोकप्रिय कोरियन सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात खास ओळख निर्माण केली होती. त्यांनी अनेक कोरियन मालिका आणि चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.नुकतेच सॉन्ग यंग-क्यू एका वादात अडकले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना दारू पिऊन गाडी चालवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. तपासादरम्यान त्यांच्या रक्तात 0.08 टक्के अल्कोहोल आढळून आले होते. या घटनेनंतर त्यांच्या करिअरवर मोठा परिणाम झाला होता. अनेक प्रोजेक्ट्स त्यांच्याकडून काढून घेतले गेले होते आणि काही भूमिकांमधून त्यांना वगळण्यात आलं होतं.
3 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्या एका परिचिताने त्यांना कारमध्ये मृत अवस्थेत पाहिलं आणि पोलिसांना माहिती दिली. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण कोरियन मनोरंजनसृष्टी हादरून गेली आहे. एक यशस्वी कलाकार असा अचानक जाणं, हे अनेकांसाठी धक्कादायक ठरत आहे.सॉन्ग यंग-क्यू यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण कोरियन सिनेसृष्टी शोकमग्न आहे.त्यांचा मृत्यू अपघाती आहे की आत्महत्येचा प्रकार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0