‘द बंगाल फाइल्स’ च्या ट्रेलरचे कोलकात्यात लॉन्च

06 Aug 2025 12:27:33
मुंबई,
The Bengal Files पॉप्युलर दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द बंगाल फाइल्स’च्या प्रमोशनसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये वर्ल्ड प्रीमियर आयोजित करत असताना त्यांनी आता जाहीर केलं आहे की चित्रपटाचा ट्रेलर कोलकात्यात प्रदर्शित केला जाणार आहे. हा निर्णय त्यांनी अशा वेळी घेतला आहे, जेव्हा चित्रपटावरून वाद अधिकच चिघळले आहेत.
 

The Bengal Files 
चित्रपटाच्या कथानकावरून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षाच्या काही सदस्यांनी चित्रपटात वादग्रस्त सामग्री दाखवल्याचा आरोप केला आहे. टीएमसीच्या नेत्यांनी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, निर्माते अभिषेक अग्रवाल आणि अभिनेत्री-निर्माती पल्लवी जोशी यांच्या विरोधात अनेक एफआयआर दाखल केल्या आहेत. या आरोपांवर उत्तर देताना, ‘द बंगाल फाइल्स’च्या निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि हायकोर्टाने सर्व एफआयआरवर तात्पुरती स्थगिती दिली आहे. तरीदेखील, न्यायालयाच्या आदेशानंतरही नव्या एफआयआर दाखल केल्या जात असल्याची माहिती आहे.
या पार्श्वभूमीवर The Bengal Files विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विचारले की, "सत्ताधारी पक्षाला सत्यापासून इतका का वाटतोय? आम्हाला गप्प का बसवायचं?" त्यांनी आपल्या चित्रपटाला भारतीय इतिहासातील एक गूढ आणि सत्यावर आधारित महत्त्वाचा भाग म्हणून संबोधलं आहे.व्हिडिओमध्ये विवेक म्हणतात की सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि इतिहासातील सत्य लपवू पाहत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे केवळ चित्रपटाविरोधात नाही, तर त्या सत्याविरोधात आहे जे आजवर समोर आले नाही. त्यामुळे त्यांनी ट्रेलर कोलकात्यातच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला, जेथे सर्व एफआयआर दाखल झाल्या आहेत. त्यांनी युवांसह सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे की, ‘द बंगाल फाइल्स’ अवश्य पाहावा.
 
 
‘द बंगाल फाइल्स’ ही विवेक अग्निहोत्री यांची **‘फाइल्स ट्रिलॉजी’**मधील शेवटची फिल्म आहे. याआधी त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द ताशकंद फाइल्स’ या चर्चित चित्रपटांची निर्मिती केली होती. ‘द बंगाल फाइल्स’मध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, तो ५ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट एक ऐतिहासिक वास्तव उलगडण्याचा प्रयत्न करतो, असं सांगत विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्ट केलं आहे की, विरोध कितीही झाला तरी ते गप्प बसणार नाहीत.
Powered By Sangraha 9.0