ब्रेकिंग न्यूज...आरमोरी-गडचिरोली महामार्गावर अपघातात चार तरुण ठार

07 Aug 2025 10:49:36
गडचिरोली, 
Accident on Armori-Gadchiroli highway आरमोरी-गडचिरोली महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला असून यात चार तरुणांनाच मृत्यू झाला आहे. सदर घटना  नागावजडतजवळ घडली.  यावेळी  भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार तरुणांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरमोरी-गडचिरोली महामार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आला आहे.
 
 

फघाग्ज
 
ही दुर्घटना इतकी भीषण होती की, साखराजवळील रस्त्यावर काही वेळासाठी शोककळा पसरली. अपघातानंतर मृतकाचे देह इतके विद्रूप झाले की ओळख पटवणं कठीण जाहले आहे  याच अपघातात आणखी दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे. पुढील एका तासात जखमींना नागपूरला हलवण्यात येणार आहे. दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी आरमोरी टी-पॉइंटवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ट्राफिक थांबवण्यात आली आहे. वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
 
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी मृत युवकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून Accident on Armori-Gadchiroli highway त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे. या अपघातात आणखी २ युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारासाठी तातडीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात येणार असून त्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या एका तासात त्यांना नागपूरला रवाना करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) हॅण्डल वरून दिली.
 
राज्य सरकारकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक युवकाच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, जखमी झालेल्या युवकांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. या दु:खद घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात शोककळा पसरली असून, Accident on Armori-Gadchiroli highway जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक मदत तातडीने पुरवली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली असून, संबंधित यंत्रणांना तत्काळ मदत व उपचाराची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
Powered By Sangraha 9.0