पावसाळ्यात घरगुती अडचणी सोडवणारे स्मार्ट हॅक्स

07 Aug 2025 14:09:33
Monsoon kitchen hacks पावसाळ्यात घरातील वातावरण ओलसर होतं आणि त्यामुळे अनेक छोट्या-छोट्या समस्यांना सामोरे जावं लागतं. रानसडकी वास येणारा फ्रीज, मसाल्यांमध्ये लागणारी सीलन, कपड्यांना येणारी दुर्गंधी, यामुळे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक थकवाही वाढतो. अशा वेळी काही स्मार्ट आणि सोप्पे उपाय तुम्हाला तुमचं काम सहज आणि झपाट्याने उरकायला मदत करू शकतात. चला पाहूया अशाच काही उपयोगी घरगुती हॅक्स:
 
 

Monsoon kitchen hacks 
१. फ्रीजमधील दुर्गंधीवर रामबाण उपाय:
 
 
पावसाळ्यात अनेकदा लाइट जात असल्याने किंवा उष्णतेमुळे फ्रीजमध्ये ठेवलेली फळं, भाज्या खराब होतात आणि दुर्गंधी येते.
उपाय: एका छोट्या वाटीत मीठ भरून फ्रीजमध्ये ठेवा.
अधिक वास असल्यास मीठात थोडंसं बेकिंग सोडा आणि लिंबाची कापं ठेवा.

२. मसाले, साखर आणि धान्यातील सीलन:
 
 
ओलाव्यामुळे पावसाळ्यात साखर, मीठ, डाळी, मसाले लवकर खराब होतात.
उपाय: सगळं साहित्य एअरटाइट डब्यांमध्ये ठेवा.
साखर व मीठामध्ये चांगले सुकवलेले तांदूळ छोटे पोटळीत घालून ठेवा.
साखरेमध्ये सिलिका जेलचा वापरही करू शकता.
मसाल्यांच्या डब्यांमध्येही याचा उपयोग होतो.
 
 
३. जळालेले भांडे स्वच्छ करण्याचा उपाय:
 
 
कढई किंवा गॅसवर दूध उकळून जळालं असेल तर
गरम कढईत थोडं आइस टाका आणि लगेच स्वच्छ करा.
किंवा भांड्यात बेकिंग सोडा, लिंबाचा रस, व्हिनेगर आणि थोडंसं पाणी टाकून उकळा – सहज स्वच्छ होईल.
 
 
४. राजमा-छोले पटकन शिजवण्याचा उपाय:
 
 
भिजवायला विसरलं असाल, तर कुकरमध्ये राजमा उकळताना थोडं मीठ टाका.
दोन शिट्ट्या झाल्यावर त्यात आइस क्यूब टाका आणि पुन्हा कुकर लावा – लवकर शिजतील.
 
 
५. कपड्यांची सीलन वास दूर करण्याचा उपाय:
 
 
पावसामुळे कपड्यांना ओलसर वास येतो.
उपाय: कपडे एका बादली पाण्यात थोडं व्हिनेगर आणि लिंबाचा रस टाकून 15-20 मिनिटं भिजवा.
नंतर मशीनमध्ये धुवा आणि शक्य असल्यास उन्हात सुकवा – कपड्यांना फ्रेश सुगंध येईल.
हे छोटे हॅक्स तुमचं काम केवळ सोपं करत नाहीत, तर वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचवतात. थोडं नियोजन आणि स्मार्टनेस वापरून तुम्ही पावसाळ्यातील घरगुती अडचणी सहज सोडवू शकता!
Powered By Sangraha 9.0